Tamil Nadu Government : तमिळनाडू सरकारने अर्थसंकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकांवरून ‘₹’ हे चिन्ह हटवले आहे. सरकारने त्याजागी तमिळ भाषेत 'ரூ' (Ru) हे चिन्ह बदलले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच भाजपने मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर पलटवार करताना हे चिन्ह एका तमिळ व्यक्तीनेच बनवले आहे, असे म्हटले आहे. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून स्टॅलिन यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत.
डी. उदय कुमार यांनी ‘₹’ हे चिन्ह साकारले आहे. त्यांचे वडील एन. धर्मलिंगम हे डीएमकेचे आमदार होते. चिन्हाचा वाद सुरू झाल्यानंतर उदय कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याचा घटनाक्रम आणि माझे वडील डीएमकेचे माजी आमदार असणे हा सर्व योगायोग असल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत उदय कुमार यांनी या वादावर भाष्य करताना म्हटले आहे की, मी तयार केलेल्या चिन्हाचा मला गर्व आहे. डीएमके सरकारच्या निर्णयाचा मला काही फरक पडत नाही. कारण एक डिझायनरला कामामध्ये अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवे. त्यामुळे माझ्या कामाचा अपमान वगैरे असे काही मी मानत नाही.
यूपीए सरकारच्या काळात 2009 मध्ये आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग घेत उदय कुमार यांनी साकारलेल्या ‘₹’ या चिन्हाची निवड झाली होती. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी सत्ताधारी डीएमके सरकारला याची आठवण करून देत एका तमिळ व्यक्तीनेच हे चिन्ह बनवले होते, असे सांगत टोला लगावला आहे.
अण्णामलाई यांच्या टीकेले डीएमकेनेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘₹’ हे चिन्ह हटवणे म्हणजे आम्ही या चिन्हाच्या विरोधात नाही. तर आम्हाला तमिळ भाषेला प्रोत्साहन द्यायचे आहे. म्हणून तमिळमध्ये हे चिन्ह लिहिले आहे, असे खुलासा पक्षाने केला आहे. दरम्यान, आज डीएमके सरकारने अर्थंसंकल्प सादर केला. यामध्ये ‘₹’ ऐवजी 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे.
दरम्यान, तमिळनाडू सरकारने नव्या शैक्षणिक धोरणातील तीन भाषा सुत्राला विरोध केला आहे. हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. त्याचा विरोध म्हणून 'ரூ' हे चिन्ह वापरले आहे. आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.