Tamil Nadu Politics : तामिळनाडूच्या सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) हा पक्षाच्या आमदाराविरोधात महिला IAS अधिकाऱ्याच्या कथित छळप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कल्लाकुरिचीचे आमदार सी. अरुळ विघ्नेश यांच्याविरोधात महिला जिल्हाधिकारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी FIR दाखल केली आहे.
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराविरोधात थेट महिला IAS अधिकाऱ्याने केलेल्या गंभीर आरोपावरून आणि त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तामिळनाडूत एकहाती सत्ता मिळवणारे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या लोकप्रियतेला देखील धक्का पोहोचला आहे.
तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे (TVK) कल्लाकुरिचीचे आमदार सी. अरुळ विघ्नेश यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी आमदारावर त्यांच्या दिसण्याबाबत आणि कपड्यांबाबत आक्षेपार्ह संदेश पाठवला होता. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असे गंभीर आरोप आहेत.
कल्लाकुरिचीच्या महिला जिल्हाधिकाऱ्यांनी (IAS Officer) 23 नोव्हेंबरला औपचारिक तक्रार दाखल केली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात आमदाराने त्यांच्या कपड्यांवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. अयोग्य वर्तन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवला. असे या तक्रारीत म्हटले होते. तसेच त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे 'कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्या'अंतर्गत (PoSH Act) स्वतंत्र तक्रारही दिली होती.
या प्रकरणी सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने कारवाईस झालेल्या विलंबावरून मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या सरकारला खडे बोल सुनावले. न्यायालयाने या तपासावर पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची देखरेख ठेवण्याचे, 22 डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आणि तक्रारदार अधिकाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्याचे निर्देश दिले होते.
तामिळनाडू सरकारने मद्रास उच्च न्यायालयात आज दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली. महिलांच्या छळास प्रतिबंध करणाऱ्या तामिळनाडू कायद्यांतर्गत आमदाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे विजय थलपती यांच्या सरकारने न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, सी. अरुळ विघ्नेश यांनी हे आरोप फेटाळले असून, हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. तसेच आपल्याला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षडयंत्र रचल्याचा दावाकेला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.