BJP Akali Dal Alliance : ज्या भाजपला 'शीख संस्थांवर कब्जा करणारा' म्हणाले, त्याच भाजपच्या चरणी बादल कुटुंब! भगवंत मान यांचा घणाघात

Bhagwant Mann targets the Badal family over the BJP-Akali Dal alliance, recalling their past remarks on farmers and Sikh institutions : शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या अकाली दलाची आता त्याच पक्षासोबत युती; सुखबीर बादल यांच्या जुन्या विधानांची आठवण करून देत भगवंत मान यांचा जोरदार हल्लाबोल
Bhagwant Mann
Bhagwant MannSarkarnama
Published on: 
Updated on: 

Bhagwant Mann attacks BJP Akali Dal alliance : पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात युती झाली. भाजपने टाकलेल्या या राजकीय डावावर विरोधक चांगलेच साधव झाले आहे. शेतकरी आंदोलन शिगेला पोहोचले असताना, शिरोमणी अकाली दलाने भाजपला विरोध घेतलेल्या भूमिकेची, अध्यक्ष सुखबीर बादल यांनी, आरएसएसच्या मदतीने(RSS) भाजप शीख संस्थांवर ताबा मिळवत आहे.

महाराष्ट्रातील हजूर साहिब आणि पाटणा साहिब येथील समित्यांवर भाजपने कब्जा केला आहे, या विधानांची आठवण करून देत, पंजाबचे आपचे नेते मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जोरदार प्रहार केला.

भाजप आणि शिरोमणी अकाली दलाच्या (SAD) युतीवर बोलताना पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान यांनी, भाजप आणि अकाली दलाने युती केली असली, तरी हे लोक एकमेकांबद्दल काय बोलतात, या आठवणींना उजाळा मिळू लागला आहे. जनतेला मूर्ख बनवण्याचा ते कसा प्रयत्न करतात. काही काळानंतर लोक सगळ्या गोष्टी विसरून जातात, असे त्यांना वाटते.

भाजप (BJP) सरकारने तीन नवीन कृषी कायदे मंजूर केले होते. त्यावेळी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष बादल कुटुंबातील सर्वजण या 'काळ्या कायद्यां'च्या समर्थनार्थ बोलत होते. ते म्हणायचे, 'हा खूप चांगला कायदा आहे, अतिशय चांगला कायदा आहे. हा कायदा अप्रतिम आहे. यामुळे पंजाबमधील शेती अधिक समृद्ध होईल,' असे सांगायचे. मात्र, शेतकरी आंदोलन शिगेला पोहोचले आणि त्याला जगभरातून पाठिंबा मिळला.

Bhagwant Mann
Sandeep Deshpande Video : 'ते' 50 लाख राहुल नार्वेकरांच्या भावाला निवडून आणण्यासाठी? शिंदेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष पवार यांच्या व्हिडीओवरून खळबळ

यानंतर बादल कुटुंबाला केलेली मोठी घोडचूक लक्षात आली आणि घुमजाव केले. पंजाबमध्ये राजकीय अस्तित्व टिकवणेही कठीण होईल. त्यामुळे हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्या कायद्यांच्या विरोधात भूमिका घेतली. 'भाजप शेतकरीविरोधी आहे, भाजप शेतकरीविरोधी आहे. आम्ही त्याग केला आहे,' अशी आरोळी ठोकली. परंतु बादल कुटुंबांच्या या बदलत्या भूमिकेला लोकांनी समजले होते. लोकांना समजले होते की, पडद्यामागे त्यांची एकमेकांशी चर्चा सुरूच होती आणि जनतेला दाखवण्यासाठी ते एकमेकांपासून वेगळे झाल्याचे नाटक करत होते. बादल कुटुंबांच्या या दुटप्पी भूमिकेवर भगवंत मान यांनी जोरदार टीका केली.

Bhagwant Mann
Non Veg Ban : मिरा-भाईंदरमध्ये भाजपची 'मांसाहारबंदी'! 25 वर्षांची परंपरा मोडली; स्वकीय नगरसेवकांचाच संताप

भाजपचे म्हणणे आहे की, 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला दिल्लीत निघणाऱ्या चित्ररथांमध्ये पंजाबचा चित्ररथ असणार नाही. आम्ही त्यांच्याशी संघर्ष करून पंजाबचा चित्ररथ समाविष्ट करण्याचे काम केले. आम्ही बीबीएमबीचेही संरक्षण केले. मी स्वतः नांगल धरणावर गेलो होतो, याची आठवण भगवंत मान यांनी करून दिली.

भगवंत मान यांनी टोलेबाजी करताना, "आज ते कोणासोबत युती करत आहेत? त्याच भाजपसोबत, ज्याच्याबद्दल सुखबीर बादल म्हणायचे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मदतीने भाजप शीख संस्थांवर ताबा मिळवत आहे. महाराष्ट्रातील हजूर साहिब आणि पाटणा साहिब येथील समित्यांवर भाजपने कब्जा केला आहे." आज त्याच भाजपच्या चरणी बसून तुम्ही राजकीय युती करत आहात. पंजाबच्या हितासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही नक्कीच येऊ, अशी ठाम भूमिका मान यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.