Tamil Nadu Farmers Crop Loan Waiver Scheme; CM C Joseph Vijay sarkarnama
देश

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! राज्य सरकारने केलं 14 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ

CM C Joseph Vijay Approves Tamil Nadu Farmers Crop Loan Waiver Scheme : तामिळनाडू सरकारची सुत्रे हाती घेताच मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी निर्णयांचा धडाका लावला असून आता शेतकऱ्यांना दिलासा घेणारा मोठा निर्णय घेतला आहे.

Aslam Shanedivan

Tamil Nadu Agriculture Relief Scheme News : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री होताच निर्णयांचा धडका सुरू केला आहे. अनेक मोठे आणि महत्वाचे निर्णय घेत त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केलं आहे. अशातच आता राज्यतील शेतकऱ्यांच्या संदर्भात महत्वाचे पाऊल उचलत त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत इतर शेतकऱ्यांनाही ५ हजार रुपयांपर्यंत दिलासा देण्याचीही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आगामी शेती हंगामासाठी याचा फायदा होईल असे बोलले जात आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सुमारे १४.२२ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून सरकारी तिजोरीवर सुमारे २,०४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. दरम्यान हवामानातील अनिश्चितता आणि शेतीचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

तसेच या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा ताण कमी होणार असून आगामी पेरणी हंगामाला वेग येणार आहे. तर या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बुस्ट मिळेल असेही सरकारचे म्हणणे आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री विजय यांनी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असून त्या दृष्टीने सरकार जात आहे.

सरकारने सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जो शेती अधिक फायदेशीर बनवण्यारा असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री विजय यांनी पुढे सांगितले की, या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना थेट मदत मिळणार असून ग्रामीण आर्थ व्यवस्थेला गती मिळेल.

आश्वासनाची पूर्तता

विधानसभा निवडणुकीदरम्यान सी. जोसेफ विजय यांनी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे आश्वासन देत पीक कर्जमाफीबाबत आश्वासन दिले होते. तसेच इतरही महत्त्वाची आश्वासने दिली होती. दरम्यान आता राज्याची सत्ता हातात येताच लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण कर्ज माफ

१ मे २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सहकारी बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांनाही ५ हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT