तामिळनाडू निवडणुकीदरम्यान भाजपाने अभिनेता विजयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न.
खुशबू सुंदर यांनी NDA मध्ये सामील होण्यासाठी दरवाजे खुले असल्याचे सांगितले.
AIADMK आघाडी बहुमताजवळ पोहोचल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.
Tamil Nadu Election Results 2026: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजकीय भूकंप झाला आहे. तीन राज्यात भाजपची सत्ता येणार आहे. तर तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. येथे अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
सध्या सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू झाल्या असून भाजप सत्तेत जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. भाजपकडून अभिनेता विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येथे भाजपच्या बड्या नेत्याने यासाठी प्रयत्न सुरू केले असून एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सोमवार (ता. ०४) सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व चित्र स्प्ष्ट झाले. ज्यात भाजपने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीत सत्तास्थापनेकडे वाटचाल केली. तर तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. केरळमध्ये डाव्यांना धक्का बसला असून येथे काँग्रेस सत्तेत आली आहे. तर तामिळनाडू विधानसभेत अभिनेता विजय यांच्या टीव्हीकेला मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान आता भारतीय जनता पार्टीने अभिनेता विजय यांना एनडीए येण्याची ऑफर दिली आहे. याबाबत आता राजकीय हालचालींनी वेग आला असून सीएनएन-न्यूज १८ च्या एका कार्यक्रमात तामिळनाडूतील भाजपच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी एआयडीएमकेच्या नेतृत्त्वाखालील आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचल्यास विजय यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचे वक्तव्य केलं आहे.
तसेच यावेळी खुशबू यांनी वियज यांचा “तांबी” (धाकटा भाऊ) असा उल्लेख करत स्वतःला “अक्का” (थोरली बहीण) असे म्हटले आहे. तसेच युतीच्या शक्यतेबाबत त्यांना विचारले असता याचा निर्णय भावालाच घ्यावा लागेल. अक्का म्हणून, माझ्या मनात विजयबद्दल अत्यंत आदर आणि स्नेह आहे. माझ्या धाकट्या भावाला माझ्या सदैव शुभेच्छा, मात्र निष्ठा ही माझ्या पक्षाशीच आहे, असेही खुशबू यांनी म्हटलं आहे.
1. भाजप विजयशी का संपर्क साधत आहे
निवडणुकीनंतर आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
2. खुशबू सुंदर यांनी काय म्हटले आहे
विजयला NDA मध्ये सामील होण्यासाठी दरवाजे खुले असल्याचे सांगितले
3. AIADMK आघाडीची स्थिती काय आहे
ती बहुमताच्या जवळ पोहोचत असल्याचे संकेत आहेत
4. विजयचा या राजकारणात काय रोल आहे
ते संभाव्य आघाडीतील महत्त्वाचा चेहरा ठरू शकतात
5. या घडामोडींचा परिणाम काय होऊ शकतो
तामिळनाडूतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.