‘Lottery King’ Santiago Martin Family Creates Political Buzz: तमिळनाडूच्या राजकारणात यावेळी एक भन्नाट योगायोग चर्चेत आला आहे. ‘लॉटरी किंग’ म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील तब्बल तीन सदस्य वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढले आणि तिघेही आमदार बनले. विशेष म्हणजे हे तिघेही वेगवेगळ्या राजकीय विचारांच्या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात होते.
मार्टिन यांच्या पत्नी लीमा रोज मार्टिन यांनी अण्णा द्रमुकच्या (AIADMK) तिकिटावर लालगुडी मतदारसंघात विजय मिळवला आहे. दुसरीकडे मुलगा जोसेफ चार्ल्स मार्टिन याने पुदुचेरीतील कामराजर नगर मतदारसंघातून विजय मिळवला. तर जावई आधव अर्जुन यांनी अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाकडून चेन्नईतील विल्लिवाक्कम मतदारसंघात दमदार विजय मिळवला आहे.
राजकारणात विचारसरणीपेक्षा ‘घरातील जागावाटप’ महत्त्वाचे ठरल्याची चर्चा यानिमित्ताने सोशल मीडियावर रंगली आहे. एका घरात एआयएडीएमके, टीव्हीके आणि पुदुचेरीतील वेगळे राजकीय समीकरण — पण शेवटी तिन्ही ठिकाणी सत्ता आणि विजय मात्र एकाच कुटुंबाच्या नावावर जमा झाला.
आधव अर्जुन हे विजय यांच्या टीव्हीके पक्षातील महत्त्वाचे चेहरे मानले जातात. त्यांनी डीएमकेच्या प्रभावी उमेदवाराचा १७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे टीव्हीकेच्या उदयामध्ये त्यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे.
विरोधकांनी या निकालावरून “तामिळनाडूत आता विचारधारा कमी आणि राजकीय नेटवर्किंग जास्त चालतंय” असा चिमटा काढायला सुरुवात केली आहे. तर समर्थक मात्र “लोकांनी काम पाहून मतदान केलं” असा दावा करत आहेत.
विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षात आधव अर्जुन हे अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वासू नेते मानले जातात. चेन्नईतील विल्लिवाक्कम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवत तब्बल १७ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने दमदार विजय मिळवला. टीव्हीकेच्या संघटनात्मक बांधणीत आणि प्रचारात त्यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे.
आधव अर्जुन हे ‘लॉटरी किंग’ म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती Santiago Martin यांच्या कन्या डेझी मार्टिन यांचे पती आहेत. त्यामुळे या विजयामुळे मार्टिन कुटुंबाची राजकीय ताकद अधिक चर्चेत आली आहे.
सँटियागो मार्टिन यांच्या पत्नी लीमा रोज मार्टिन यांनीही तामिळनाडूतील लालगुडी मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. द्रमुक (DMK) आणि टीव्हीकेकडून कडवे आव्हान असतानाही त्यांनी सुमारे अडीच हजार मतांच्या फरकाने बाजी मारली.यामुळे तामिळनाडूच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून जिंकून येण्याची दुर्मिळ राजकीय घटना पाहायला मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.