Tamil Nadu Election Results | Vijay Fan Self-Harm Attempt Sarkarnama
देश

Tamil Nadu Results : तमिळनाडूत भल्याभल्यांना धूळ चारणाऱ्या विजय यांच्या पराभवाची बातमी ऐकून चाहत्याने कापून घेतला गळा, 'त्या' दोन मतदारसंघात आघाडी की पिछाडी?

Vijay Fan Self-Harm Attempt : टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष विजय हे तामिळनाडूतील दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यापैकी तिरुचिरापल्ली (पूर्व) मदरारसंघातून सहाव्या मतमोजणीच्या फेरीत त्यांना एकूण 24 हजार 884 मते मिळाली असून ते 9 हजार 639 मतांनी आघाडीवर आहेत.

Jagdish Patil

Tamil Nadu Election Results : देशभरातली तमिळनाडूसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. मात्र, तामिळनाडूत मतमोजणी दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे सर्वेसर्वा विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून त्यांच्या एका चाहत्याने थेट गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णगिरी जिल्ह्यातील २८ वर्षीय के. महेंद्रन नावाच्या तरूणाने विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून टोकाचं पाऊल उचललं आहे. महेंद्रन हा विजय यांचा कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.

तर मतमोजणीला सुरू होण्याआधी काही वेळ ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकल्यानंतर महेंद्रन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला आणि त्याने आपल्या घराजवळच गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला.

यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी जखमी महेंद्रनला तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर कृष्णगिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, कृष्णगिरी शहर पोलिसांनी महेंद्रनची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मात्र, या घटनेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या अफवा पसरवण्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचं उदाहरण समोर आलं आहे. त्यामुळे कोणीही खोटी माहिती पसरवू नये, असं प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे.

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असून आतापर्यंतच्या कलांनुसार विजय यांचा टीव्हीके पक्ष आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर AIADMK–BJP आघाडीवर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील DMK पक्ष आहे.

विजय कोणत्या मतदारसंघातून आघाडीवर?

टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष विजय हे तामिळनाडूतील दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यापैकी तिरुचिरापल्ली (पूर्व) मदरारसंघातून सहाव्या मतमोजणीच्या फेरीत त्यांना एकूण 24 हजार 884 मते मिळाली असून ते 9 हजार 639 मतांनी आघाडीवर आहेत. तर पेरंबूर मतदारसंघातून त्यांना सहाव्या फेरीत 34 हजार 482 मते पडली असून ते 13 हजार 574 मतांनी आघाडीवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT