

Amit Shah News : पाच राज्यांच्या निवडुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या निकालामध्ये सर्वाधिक उत्सुकता होती ती पश्चिम बंगालची. तब्बल 15 वर्ष सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी या पुन्हा सत्तेत येणार की भाजप मुसंडी मारणार याची चर्चा होती. मात्र, जे कल समोर येत आहेत. त्यानुसार भाजप बहुमताने सत्तेत येताना दिसून येत आहे. 2011 मध्ये भाजप पश्चिम बंगालमध्ये अस्तित्व नाममात्र होते. मात्र, अवघ्या 15 वर्षात तेथे सत्ता मिळवण्यामागे अमित शाहांची रणनीती महत्त्वपूर्ण ठरली असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीची तब्बल 38 वर्षांची सत्ता उलधवून ममता बॅनर्जी यांची टीएमसी सत्तेत आली होती. माँ, माँटी, मानूस अशी घोषणा त्यांनी दिली होती. टीएमसीचे त्यावेळी मोठे केडर नव्हते मात्र जनआंदोलनातून ममता बॅनर्जींनी सत्तांतर करून दाखवले. त्यानंतर सलग पंधरा वर्ष त्या सत्तेत होत्या. त्यावेळी प्रमुख विरोधक म्हणून भाजपचा उदय झाला.
पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी अमित शाहांनी स्वतंत्र नेते उभे करण्यापेक्षा केंद्रातील सत्तेचा वापर करत ममता बॅनर्जींच्या जवळ असलेल्या नेत्यांना फोडायला सुरुवात केली. ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू असलेले सुवेंधू अधिकारी यांना फोडत ममता बॅनर्जींचे प्रमुख विरोधक म्हणून उभे केले. ममतांना टक्कर देता येऊ शकते हे त्यातून त्यांनी दाखवून दिले. विशेष म्हणजे 2019 ला ममता बॅनर्जी या सुवेंधूंच्या विरोधात नंदीग्राममधून लढल्या मात्र त्यांना तेथे पराभव स्वीकारावा लागला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत बंगाली अस्मिता विरुद्ध हिंदुत्व अशी लढत असल्याची चर्चा होती. ममता बॅनर्जींनी बंगाली अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर मात केली होती. त्यामुळे अमित शाह यांनी या वेळी निवडणुकीत बंगाली अस्मितेचा वापर आपल्या बाजुने केला. हिंदुत्वाचा प्रचार करत असताना बंगाली अस्मिता दुखावली जाणार नाही यावर भर दिला. बंगाली अस्मिता म्हणजे ममता बॅनर्जी नाहीत हे दाखवून देत बेरोजगारी, विकास, स्थलांतर असे मुद्दे उपस्थित केले.
पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मुर्शीदाबाद सारखे जिल्ह्यामध्ये मुस्लिम मतदार 90 टक्के आहेत. हा पूर्वी मतदार काँग्रेसचा होता. मात्र, टीएमसी सत्तेत येताच मुस्लिम मतदार ममता बॅनर्जींच्या मागे उभा राहिला. त्यामुळे अमित शाहांनी टीएमसी विरोधात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा मांडून मतदान ध्रुवीकरणावर भर दिला. ममतांनी 2019 ला मुस्लिम, महिला मतदारांनी तारले होते. त्याविरोधात आक्रमक हिंदुत्वाचा प्रचाराची रणनीती भाजपकडून आखण्यात आल्याची दिसली.
अमित शाहांनी रणनीती आखत असताना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. तसे केले असते तर थेट लढत ममता बॅनर्जी विरुद्ध तो नेता अशी झाली असती. आणि त्याचा फायदा ममता बॅनर्जींना झाला असता. मात्र, ही निवडणूक स्थानिक चेहऱ्यावर न लढता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढली गेली. त्याचा फायदा भाजपला झालेल्या दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाने राबवलेल्या एसआयआर प्रक्रियेमुळे तब्बल 10 टक्के मतदारांची नावे कापली गेली आहेत. यात मुस्लिम मतदारांची नावे सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. 90 लाखांपेक्षा जास्त नावे कापली गेल्याचे सांगितले सुरुवातीला सांगितले गेले. मात्र, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या कमी झाली. मात्र, जी नावे कापली गेली त्यामध्ये ममता बॅनर्जींचे मतदार सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. त्याचाच फटका या निकालातून दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.