Actor Vijay politics news : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी आणखी काही दिवस आहे. या निवडणुकीत यावेळी सर्वाधिक चर्चा आहे ती सुपरस्टार विजय यांच्या पक्षाची. ही त्यांची पहिलीच निवडणूक असून लोकांकडून मोठा प्रतिसादही मिळताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा करिष्मा चालल्यास कुणाला फटका बसणार, याबाबत उत्सुकता वाढलेली असतानाच विजय यांनाच पहिला झटका बसला आहे.
विजय यांच्या तमिझगा वेटरी कडगम (TVK) पक्षाला मतदानाआधीच एक जागा गमवावी लागली आहे. निवडणूक आयोगाने एडप्पाडी विधानसभा मतदारसंघातील टीव्हीकेच्या उमेदावारांचे अर्ज बाद केले आहेत. विशेष म्हणजे हा मतदारसंघ भाजपचा मित्रपक्ष असलेल्या एआयडीएमकेचा बालेकिल्ला आहे. माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी या मतदारसंघातील उमेदवार आहेत.
टीव्हीकेने या मतदारसंघातून अरूणकुमार एम यांना उमेदवारी दिली होती. पण आवश्यक प्रस्तावकांच्या सह्या नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. या पक्षाच्या आणखी एका महिला उमेदवाराने डमी अर्ज दाखल केला होता. पण त्याच कारणास्तव त्यांचाही अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे आता या मतदारसंघात टीव्हीके पक्षाचा उमेदवार नसेल.
उमेदवार गायब
एवढेच नाही तर उमेदवारी अर्ज छाननीवेळी विजयकुमार उपस्थित नव्हते. काही तासांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांचे अपहरण करण्यात आल्याची भीती पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या घडामोडींनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले.
दरम्यान, एडप्पाडी मतदारसंघात आता पलानीस्वामी यांच्याविरोधात सत्ताधारी डीएमके पक्षाचे सी. कासी रिंगणात आहेत. या दोघांचेही उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. विजय यांनीही दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे.
तमिळनाडूमध्ये २३ एप्रिलला मतदान होणार असून चार मे रोजी निकाल लागणार आहे. राज्यात एकूण २३४ मतदारसंघात निवडणूक होत आहे. ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. केवळ पश्चिम बंगालममध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये गुरूवारी (९ एप्रिल) मतदान होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.