SM Nasar
SM Nasar sarkarnama
देश

SM Nasar News : हे वागणं बरं नव्हं..; मंत्र्यानेच कार्यकर्त्यावर..; 'हा' VIDEO पाहाच

सरकारनामा ब्युरो

SM Nasar News : मंत्र्याने आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशीलात लगावणे, शिवीगाळ करणे अशा घटना आपण यापूर्वी ऐकल्या आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यात एक मंत्री आपल्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करीत असताना दिसते. एएनआय या वृत्तसंस्थेनं आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मंत्र्याच्या अशा वागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांना ट्रोलही केले जात आहे. (SM Nasar news update)

ही घटना तामिळनाडू येथे काल (मंगळवारी) घडली. या व्हिडिओमध्ये एसएम नासर तिरुवल्लूरमधील एका कार्यक्रमात द्रमुक कार्यकर्त्यांवर एक मंत्री दगडफेक करताना दिसत आहेत. एसएम नसीर असे या मंत्र्याचं नाव आहे.

नसीर हे तामिळनाडू सरकारमध्ये दुग्धव्यवसाय मंत्री आहेत. त्यांच्या या वागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

एका कार्यक्रमासाठी नसीर हे आले होते. त्यांना बसण्यासाठी खूर्ची नव्हती. यावेळी त्यांना खूर्ची आणण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांने उशीर केला. त्यामुळे मंत्र्यांचा राग अनावर झाला. त्यांनी चक्क या कार्यकर्त्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. हा प्रकार पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं.

या सात सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एसएम नासर मोकळ्या जागेवर उभे आहेत. त्यांच्या मागे काही लोक उभे असलेले दिसतात. एक कार्यकर्ता त्यांच्यासाठी खूर्ची घेऊन येत आहे. त्याला उशीर झाल्यामुळे ते त्याला दगड मारत आहेत, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गेल्या विधानसभा निवडणूक नासर यांनी आवाडी मतदारसंघातून लढवून पंडियाराजन यांचा पराभव केला होता. दुग्धव्यवसाय मंत्री म्हणून ते खूप सक्रिय आहेत. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के.अन्नामलाई यांनी मंत्र्यांच्या विधानावर जोरदार टीका केली.

यापूर्वी नासर यांनी सरकारने दुधावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लादल्याची चुकीची माहिती पसरवून गेल्या वर्षी चर्चेत आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT