Tamil Nadu 2025 political news : बिहारमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूसह केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही भाजपची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. पण त्यानंतर काही दिवसांतच तमिळनाडूमध्ये एनडीएला मोठा झटका बसला आहे. अण्णा द्रमुक पक्षाने काही दिवसांपूर्वीच निलंबित केलेल्या बड्या नेत्याने विजय यांच्या तमिलगा वेटरी कझगम पक्षात प्रवेश केला आहे.
के. ए. सेनगोट्टीयान असे या नेत्याचे नाव आहे. ते तब्बल नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. अण्णा द्रमुक पक्षातील पक्षातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक होते. त्यांच्या विरोधी पक्षातील प्रवेशामुळे पक्षाला मोठा दणका बसल्याचे मानले जात आहे. तर विजय यांची ताकद वाढली आहे. जयललिता यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते.
राज्यात पुढीलवर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. पश्चिम तमिळनाडूतील गौंडर समाजातील नेते म्हणून सेनगोट्टीयान यांची ओळख आहे. तमिळनाडूत कानाकोपऱ्यात अण्णाद्रमुखला पोहचविण्यासाठी त्यांचाही मोठा हातभार होता. तसेच प्रचाराची रणनीती ठरविण्यामध्ये ते आघाडीवर असायचे.
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या विश्वासू नेत्यांपैकी ते एक होते. विजय यांनी आज आपल्या पक्षात सेनगोट्टीयांना यांचे स्वागत गेले. विजय यांच्यासाठी हा पहिला मोठा बूस्ट मानला जात आहे. या पक्षप्रवेशानंतर विजय म्हणाले, सेनगोट्टीयान यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना एमजीआर आणि जयललिता यांचा सहवास मिळाला. त्यांचा राजकीय अनुभवाचा पक्षाला निश्चितच फायदा होईल.
दरम्यान, सेनगोट्टीयान यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सोडून गेलेल्या किंवा पक्षाने निलंबित केलेल्या नेत्यांना परत घ्यावे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम तसेच जयललिता यांच्या विश्वासू शशिकला आणि टीटीव्ही दिनकरन यांचा समावेश होता. सेनगोट्टीयान यांनी काही दिवसांपूर्वीच शशिकला आणि पनीरसेल्वम यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच पक्षाचे प्रमुख पलानीस्वामी आधी त्यांना पक्षातील पदावरून हटवले आणि नंतर पक्षातून निलंबित केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.