Smart Village news : काटेवाडीसह राज्यातील 75 गावं होणार स्मार्ट अन् इंटेलिजेंट; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, यादी केली जाहीर...

Maharashtra Smart Village Project : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खुर्सापार, जुनापाणी, नांदोरा, खापा, कचरी सवांगा, सबकुंड, खापरी (बरोकर), मूर्ती, दुधाळा, चंदनपरडी ही गावे प्रकल्पात आहेत.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Intelligent Village scheme Maharashtra : राज्यातील गावांचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागाचे रुपांतर स्वयंपूर्ण, तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यांतील 75 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील किमान 10 गावांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या निर्णयाचा जीआर जारी करण्यात आला आहे. स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्पांतर्गत डिजिटल संपर्क, ई-शासन, शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यावर भर देऊन त्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग घेऊन स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

भारतनेट फेज-१ व २ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातील मौजे सातनवरी या गावात प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यानंतर आता हा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये राबविण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात प्रयोगिक तत्वावर राज्यातील नागपूर, अमरावती, पुणे व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील एकूण ७५ गावांमध्ये राबिण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
BJP MLA News : शरद पवारांच्या नेत्यावर झालेल्या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड भाजप आमदार? खाडेंच्या सहकाऱ्याने थेट नाव सांगत टाकला बॉम्ब...

प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील बोराळा, बेलोरा, चिंचोली काळे, बडूरा, खरवाडी, खराळा, जवळा शहापूर, जैनपूर, तळवेल, रसुल्लापूर, कृष्णापूर, विरुळ पूर्णा, आसेगाव, टाकरखेडा पूर्णा, धानोरा सर्फाबाद, फुबगाव, राजुरा, बेसखेडा, शिरजगाव बंड, हैदतपूर आणि शिराळा या गावांचा समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यातील सांडस, सालेगाव, सोडेगाव, सावंगी तर्फे नांदापूर, सेलसुरा, उमरा, मसोड, रामवाडी, असोलवाडी, कळमकोंडा, शेनोडी ही गावे आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील निमअरुळे, सडुरे-शिराडे, कुर्ली, लोरे नं २, आचीर्णे, खांबाळे, अरूळे, कुसूर, उंबर्डे, तिरवडे तर्फे खारेपाटण, हेत, उपळे, नेर्ले, येडगाव, सोनाळी, कुंभवडे, आखवणे-भोम, मांगवली, भूईबावडा, ऐणारी आणि मौदे या गावांचाही समावेश करण्यात आला आहे.  

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Nitish Kumar News : नितीश कुमार 2021 सारखा मोठा राजकीय खेळ करणार? विरोधी पक्षाचं विधिमंडळातील अस्तित्व धोक्यात?

नागपूर व पुण्यातील कोणती गावे?

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खुर्सापार, जुनापाणी, नांदोरा, खापा, कचरी सवांगा, सबकुंड, खापरी (बरोकर), मूर्ती, दुधाळा, चंदनपरडी ही गावे प्रकल्पात आहेत. तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याची निवड करण्यात आली असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बारामतीतील मोरगाव, डोर्लेवाडी, पणदरे, गुणवडी, वानवडी, पिंपळी, सुपे, करंजे आणि मुरूम या गावांचा समावेश करण्यात आला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com