PMK News : विधानसभा निवडणुकीत एकामागून एक विजय मिळवणाऱ्या भाजपचे दक्षिण विजयाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. कर्नाटकमध्ये त्यांचा पराभव करून काँग्रेस विजयी झाली. तर, तेलंगणामध्ये देखील काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहेत. भाजप तमिळनाडूमध्ये मित्रपक्षांसोबत सत्तेत येण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, तामिळनाडूमध्ये झटका बसला आहे. मित्रपक्ष पट्टाली मक्कल काची (पीएमके ) भाजपची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत.
पीएमकेचे डीएमके पक्षाचे प्रमुख, मुख्यमंत्री के स्टॅलिन यांना खुली ऑफर दिली आहे. डीएमकेने वन्नियार समाजला अतिमागास घटकातून 15 टक्के आरक्षण दिले तर आपण डीएमकेला निवडणूकीत साथ देऊ असे पीएमके पक्षाकडून सांगण्यात आले आहे. डीएमके पक्ष हा काँग्रेसची आघाडी असलेल्या इंडियाचा भाग आहे. त्यामुळे पीएमकेने डीएमकेला साथ दिली तर ते सुद्धा भाजप विरोधकांच्या इंडिया आघाडीत जातील.
पीएमकेचे उत्तर तमिळनाडूमध्ये तसेच वन्नियार समाजामध्ये प्रभाव आहे. त्यामुळे पीएमकेने डीएमकेला साथ दिली तर 2026 मध्ये होणार विधानसभा निवडणूक भाजप आघाडीसाठी कठीण जाण्याची शक्यता आहे.
पीएमकेचे अध्यक्ष अंबुमणी रामदास यांनी सांगितले की, जर 2026 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी वन्नियार समाजाला आरक्षण दिले तर त्यांचा पक्ष डीएमकेला बिनशर्त पाठींबा देईल. तसेच कोणत्याही जागेवर निवडणूक लढणार नाही.
तमिळानाडूमध्ये तब्बल 69 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये 30 टक्के आरक्षण मागास जातींना, 20 टक्के अतिमागास (एमबीसी) जातींना तर 18 टक्के अनुसूचित जाती, 1 टक्के अनुसूचित जमातींना आरक्षण देण्यात आले आहे. एमबीसी कोट्यातून वन्नियार समजाला पीएमकेने 15 टक्के आरक्षणाची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.