Santosh Deshmukh Murder Case : मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला दोन दिवसांचा 'अल्टिमेटम'; बीड जिल्हा पोलिस दलाविषयी 'मोठी' मागणी

Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case Maratha Kranti Morcha Beed district police force Mahayuti government : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मराठी क्रांती मोर्चाने महायुती सरकारकडे मोठी मागणी करत दोन दिवसांत निर्णय अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
Santosh Deshmukh 5
Santosh Deshmukh 5Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यानंतर भेटीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे का? असा सवाल करत, गुन्ह्यातील मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला.

तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम घालायचा असेल, तर एकट्या पोलिस अधीक्षकांची बदली करून काही होणार नाही. बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्याची मागणीही मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

बीडचे (BEED) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली असून, त्यांच्या कुटुंबियांच्या न्यायाच्या लढाईत ते एकटे नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज देशमुख कुटुंबियांच्या मागे उभा आहे, असेही आबा पाटील यांनी सांगितले.

Santosh Deshmukh 5
Devendra Fadnavis : काँग्रेसला CM फडणवीसांनी धू धू धुतले; म्हणाले, 'मोदी अन् शाह स्वप्नात...' पाहा VIDEO

तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला एका पोलिस (Police) अधीक्षकांच्या बदलीने आळा बसणार नाही. हे मोठं जाळ आहे. ते उद्धवस्त करायचे असेल, तर बीड पोलिस दलातील सर्व अधिकाऱ्यांची बदली एका महिन्यात जिल्ह्याबाहेर करा, अशी मोठी मागणी मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Santosh Deshmukh 5
Devendra Fadnavis : गडचिरोलीचे पालकमंत्री कोण होणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

दोन दिवसात सर्व आरोपी अटक करा. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल, बीड जिल्हा शांत ठेवायचे असेल, तर सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटेम आहे असा इशारा मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिला. तसेच देशात कायदा मोठा आहे. इथं पंतप्रधानांना देखील अटक झाली होती. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देखील अटक झाली होती. या घटनेत दोन दिवसात गुन्हेगारांना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देण्यात आला.

तर देशाला काळजी लावणारी घटना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बीडमधील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. थोरात म्हणाले, "संतोष देशमुख यांना ज्या प्रकारे निर्घृणपणे मारण्यात आले आहे, हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. महाराष्ट्र नाही, तर देशाला काळजी लावणारी ही घटना आहे". बीडमध्ये जिल्ह्यात राजकीय हस्तक्षेपांचा अतिरेक झाला आहे. बीडमध्ये 28 तारखेला निघत असलेल्या मोर्चात सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन थोरात यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com