MK Stalin strategy Sarkarnama
देश

MK Stalin strategy : स्टॅलिन यांचा ‘मास्टरस्ट्रोक’? थलपती विजय मुख्यमंत्री होण्यामागे 'डीएमके'ची गुप्त खेळी

DMK M. K. Stalin reportedly convinced alliance partners political coordination, paving Vijay TVK emergence Tamil Nadu politics : तामिळनाडूमधील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यात आणि विजय यांच्या टीव्हीके सरकार स्थापन होण्यामागे एम. के. स्टॅलिन यांनी महत्त्वाची राजकीय भूमिका निभावल्याचं समोर आलं आहे.

Pradeep Pendhare

Tamil Nadu political news : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर तिथली राजकीय परिस्थिती त्रिशंकू झाली होती. विजय यांचा टीव्हीके पक्ष बहुमताच्या जवळ असून, देखील सत्ता स्थापनेला विलंब होत होता. बहुमताचा कागद घेऊन, चार वेळा राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा विजय यांनी केला होता. पण राज्यपालांनी त्यांना दरवेळी मागं लावलं.

कुठेतरी केंद्रातील भाजप सरकारचा हस्तक्षेप होईल, अन् राजकीय आणि घटनात्मक पेच निर्माण होईल, यातून डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांनी विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षाचा सत्ता स्थापनेचा मार्ग खुला केला.

डीएमकेचे (DMK) प्रवक्ते ए. सरवनन यांनीच, एम. के. स्टॅलिन यांनी, विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी काय महत्त्वाची राजकीय भूमिका निभावली, असा खळबळजनक दावा केला आहे. राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ नये, यासाठी स्टॅलिन यांनीच आपल्या मित्रपक्षांना तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) बरोबर हातमिळवणी करण्यासाठी तयार केल्याचे डीएमकेचे प्रवक्ते ए. सरवनन यांनी दावा केला आहे.

ए. सरवनन यांनी, हा दावा करताना, सुरवातीला तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या विजय (Thalapathy Vijay) यांचे अभिनंदन केले आहे. डीएमकेच्या मित्रपक्षांच्या मदतीने विजय हे मुख्यमंत्री बनले आहेत. आमचे नेते एम. के. स्टॅलिन यांना घटनात्मक संकट निर्माण व्हावे असे वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी व्यापक चर्चेनंतर मित्रपक्षांना टीव्हीकेबरोबर हा‍तमिळवणी करण्यासाठी तयार केले, असे म्हटले आहे. असे सरवनन यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील काँग्रेसवर टीका करताना, ए. सरवनन यांनी काँग्रेसला राज्यात ज्या पाच जागा मिळाल्या आहेत, त्यात टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे म्हटलं आहे.

तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा राजकीय पेच निर्माण झाला होता. विजय यांच्या टीव्हीके पक्षाचा सर्वाधिक 108 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा पक्षात राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु, विजय स्वतः दोन जागांवर विजय झाले आहेत. त्यातील एक जागेवर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीव्हीके यांचे पक्षबळ हे 107वर येणार आहे.

टीव्हीकेला काँग्रेस पाच, आणि सीपीआय व सीपीआय (एम) या पक्षांच्या प्रत्येकी दोन, यानंतर इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) पक्षाच्या चार आमदार, असे मिळून टीव्हीकेचे संख्याबळ 120वर पोहोचले आहे. बहुमतासाठी 118 जागा पाहिजे होत्या. इंडियन यूनियन मुस्लिम लीग हा पक्ष डीएमकेचा मित्र पक्ष आहे. या मित्रपक्षाला टीव्हीकेबरोबर हातमिळवण्यासाठी डीएमकेचे सर्वेसर्वा एम. के. स्टॅलिन यांनीच पडद्यामागे महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका निभावल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT