K Annamalai  sarkarnama
देश

K Annamalai Resignation News : तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंचा राजीनामा अन् म्हणाले...

BJP Tamil Nadu Leadership Change : ...त्यानंतर अन्नामलाई यांनी दिल्लीत जाऊन पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली होती.

Mayur Ratnaparkhe

Tamil Nadu BJP President Resigns : तामिळाडूमधून भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांनी अध्यक्षपदचा राजीनामा दिला आहे. शिवाय, त्यांनी हेही म्हटले आहे की, ते पक्षाच्या पुढील प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही. पक्षातील सर्वजण मिळून एका नव्या अध्यक्षाची निवड करतील.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने हे पाऊल राज्यातील जातीय समीकरण पाहता उचललं आहे. कारण, मागील काही दिवसांत AIADMKचे सरचिटणीस ई पलानीस्वामी आणि गृहमंत्री अमित शाह(Amit Sahah) यांच्यात झालेल्या बैठकीनंतरच, असा अंदाज वर्तवला जात होता की, तामिळनाडू भाजपच्या नेतृत्वात बदल होवू शकतो.

यामागे कारण सांगितले जात आहे की, AIADMKने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर अट ठेवली आहे की, तामिळनाडूत अन्नामलाई यांची जागी पक्षाच्या एखाद्या दुसऱ्या नेत्यास अध्यक्ष बनवलं जावं. ज्यानंतर अन्नामलाई यांनी दिल्लीत जाऊन पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली होती.

अन्नामलाई यांनी राजीनामा देत सांगितले की, ९ एप्रिल रोजी नवीन अध्यक्षाची घोषणा होवू शकते. निवडणुकीपूर्वी अन्नामलाई यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षासाठी मोठं पाऊल ठरू शकतो.

अन्नामलाई यांच्या राजीनाम्यानंतर अनेक चेहरे प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत मानले जात आहेत. यामध्ये केंद्रीयमंत्री एल मुरुगन, तमिलसाई सौंदर्यराजन आणि नैना नागेंद्रन या नावांचा समावेश आहे. तामिळाडूत भाजपची(BJP) संघटनात्मक निवडणूक झाली आहे आणि नवीन अध्यक्षांची निवडणूक दोन आठवड्यात होणार आहे, मात्र त्याआधीच अन्नामलाई यांचा राजीनामा आणि प्रदेशाध्य पदाच्या निवडणुकीत सहभागी न होणं सांगतं, की तामिळाडू भाजपला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT