Eknath Shinde and Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीवेळी जिथे उद्धव ठाकरेंची झाली होती पहिली सभा, तिथेच आता एकनाथ शिंदेंचीही तोफ धडाडणार!

Eknath Shinde Rally : सभेकडे लागले सर्वांचेच लक्ष; जाणून घ्या, नेमकी कोणत्या ठिकाणी होणार आहे सभा?
Eknath Shinde and Uddhav Thackary
Eknath Shinde and Uddhav Thackarysarkarnama
Published on
Updated on

Deputy CM Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात सभा घेतली. त्याच राधानगरी विधानसभा मतदारसंघात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही तोफ धडाडणार आहे. विधानसभा निवडणूक कालावधीतील पहिली आणि कोल्हापुरातील एकमेव राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघात आदमापूर येथे ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच शेजारील गावात सरवडे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मेळावा होणार आहे.

याच मतदारसंघातून सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे ठाकरेंचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांचा पराभव करून विजयी झाले होते. त्यांच्याच बालेकिल्ल्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackary
Sangola Politics : शहाजीबापूंची आमदार बाबासाहेब देशमुखांना थेट ऑफर; या महिन्यात निर्णय घ्या, दंडवत घालत तुमच्या घरी दर्शनाला येतो’

विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackary) यांची पहिलीच आणि कोल्हापुरातील एकमेव सभा ही राधानगरी विधानसभा मतदारसंघात झाली होती. सभेवेळी ठाकरे हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तुटून पडले होते. गद्दारांना गाडा. त्यांना उखडून टाका. त्यांना धडा शिकवा. गद्दारांसोबत गेलेला तुमच्याच मतदारसंघातील आमदार आहे. त्यांचा देखील निकाल लावा. या शब्दात ठाकरे शिंदेंच्या आमदारांसह शिंदेंवर बरसले होते. मात्र निवडणुकीच्या निकालात शिंदेंचे उमेदवार आमदार प्रकाश अबीटकर विजयी झाले.

तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच मतदारसंघात सभा घेत मतदारांना आबिटकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. तुम्ही आमदार करा मी नामदार करून पाठवतो, अशा शब्दांत शिंदे यांनी मतदारसंघातील मतदारांना शब्द दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री शिंदे हे राधानगरी मतदार संघात येत आहेत. सरवडे येथे त्यांचा आभार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात काय बोलणार याकडे मतदारसंघातील नागरिकांची लक्ष आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackary
Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी भरसभेत स्टेजवरच स्वतःच्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या, म्हणाले ‘कशासाठी आपण हे पाप केलं...’

सभा उधळण्याचा इशारा -

दरम्यान उद्या होणाऱ्या सभेकडे शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्याला शक्तीपीठ विरोधी कृती समितीने विरोध केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे उद्या होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा शक्तिपीठ विरोधी कृती समितीने दिला आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com