The Tehsildar involved in the administrative blunder was suspended within hours after wrongly issuing a death certificate for a person from Bhind, Madhya Pradesh.  Sarkarnama
देश

Death Certificate : तहसीलदाराचा प्रताप, थेट जिल्ह्याचेच मृत्यू प्रमाणपत्र केलं जारी; काही तासांत निलंबन...

Tehsildar Issues Death Certificate for Bhind District – A Blunder : भिंड जिल्ह्यातील भिंड तहसील कार्यालयातून हे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. याप्रकरणात तहसीलदार मोहनलाल शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Rajanand More

Tehsildar Suspension : प्रशासकीय अधिकारी कामामध्ये किती टोकाचा निष्काळजीपणा करू शकतात, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. एका तहसीलदारांनी चक्क जिल्ह्याच्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र जारी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये मृत्यू झालेली व्यक्ती, त्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव, एवढेच नाही तर आईच्या नावाच्या ठिकाणीही जिल्ह्याचे नाव छापून ते प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र जारी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित तहसीलदाराला प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणात तहसीलदार मोहनलाल शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भिंड जिल्ह्यातील भिंड तहसील कार्यालयातून हे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आल्यानंतर तहसीलदारावर कारवाई करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या प्रमाणपत्रामध्ये पहिल्या परिच्छेदात मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या परिच्छेदात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाऐवजी भिंड हे जिल्ह्याचे नाव छापण्यात आले आहे. एवढेच नाही तर वडील आणि आईच्या नावाच्या रकान्यातही भिंड असे छापण्यात आले आहे. हीच चूक तिसऱ्या परिच्छेदातही करण्यात आली आहे. या प्रमाणपत्रावर तहसीलदार मोहनला शर्मा यांची सही असून ता. 5 मेला प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले आहे.

भिंडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एल. के. पांडे यांनी मोहनलाल शर्मा यांना निष्काळजीपणामुळे पदावरून हटविण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, भिंडमधील चतुर्वेदी नगर कॉलनीतील रहिवासी गोविंद यांनी लोकसेवा केंद्रात वडील रामहेत यांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर काही दिवसांत त्यांना मृत्यू प्रमाणपत्र मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT