Jyoti Malhotra Controversy : यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा दहशतवादाशी संबंध आढळलेला नाही! पोलिसांनीच दिली कबुली

Jyoti Malhotra Hisar Police Pakistan : ज्योती ही पाकिस्तानचे उच्चायुक्तलायतील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती. दानिशसोबत असलेल्यासंबंधामुळे चौकशी यंत्रणांची नजर तिच्यावर गेली आहे
Hisar Police clarify: No terror connection found with Jyoti Malhotra as per current investigation.
Hisar Police clarify: No terror connection found with Jyoti Malhotra as per current investigation.sarkarnama
Published on
Updated on

Jyoti Malhotra News : यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर माध्यमांमधून ज्योतीच्या डायरीचे काही पाने प्रसिद्ध करत तिला पाकिस्तानला जायचे होते असा दावा करण्यात येतो आहे. तसेच तिने भारतातील धार्मिक स्थळांना भेट देत त्याची माहिती पाकिस्तानला पुरवली. ज्योती विषयी वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. आता हरियाणातील हिसार पोलिसांनी ज्योतीबाबत मोठा खुलासा केला आहे.

हिसार पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्या म्हटले आहे की, 'ज्योतीचा कोणत्याही दहशतवादी कृत्यात सामील असल्याबाबत कोणताही पुरावा आत्तापर्यंत समोर आलेला नाही. तिचा कोणत्याही पीआयओ (विदेशी नागरिक) सोबत विवाह, धर्मांतर किंवा तत्सम बाबतीतही कोणतेही तथ्य समोर आलेले नाही.

ही चौकशी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. पोलिसांनी सर्व माध्यम प्रतिनिधींना आणि सोशल मीडिया युजर्सना आवाहन केले आहे की, त्यांनी संयम पाळावा आणि केवळ अधिकृत माहितीच प्रसिद्ध करावी. अधिकृतपणे पुष्टी झाल्यावरच बातम्या प्रकाशित कराव्यात.'

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले नष्ट केले. भारत पाकिस्तानमध्ये त्यानंतर युद्ध देखील झाले. या दरम्यान ज्योती ही पाकिस्तानचे उच्चायुक्तलायतील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती.

दानिशसोबत असलेल्यासंबंधामुळे चौकशी यंत्रणांची नजर तिच्यावर गेली आहे. ज्योतीने पाकिस्तानचा दौरा करून व्हिडिओ देखील बनवले होते. तिच्या पाकिस्तान दौर्‍यांचे प्रत्येक व्हिडीओ, तिचा खर्च, तिचे मित्र, तिचे वैयक्तिक चॅट्स – हे सर्व संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Hisar Police clarify: No terror connection found with Jyoti Malhotra as per current investigation.
Cash Controversy : एकनाथ शिंदेंच्या आमदाराच्या पीएच्या खोलीत सापडले पैशांचे घबाड, अनिल गोटेंकडून वस्त्रहरण!

हिसास पोलिसांनी स्पष्ट केले की, 16 मे रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 152 आणि सरकारी गोपनीयता कायद्यांतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. ती काही संशयित लोकांच्या संपर्कात होती आणि तिने महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण केली होती. मात्र, तपास सुरू असताना अनेक तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे तपासावर विपरीत परिणाम होत आहे.

पाच दिवसांची कोठडी

पोलिसांनी सांगितले की आरोपी ज्योतीकडून 3 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप आणि काही अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ही उपकरणे तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत.

याच प्रकरणात कुरुक्षेत्रचा रहिवासी हरकीरत याला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हरकीरत व्हिसा सेवा पुरवतो. पोलिसांनी त्याच्याकडूनही 2 मोबाईल फोन जप्त केले आहेत, मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.ज्योती मल्होत्रा सध्या 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी

ज्योतीची चौकशी हिसार पोलिस सखोलपणे करत आहेत. प्रोटोकॉलनुसार काही केंद्रीय तपास यंत्रणांनीही तिची चौकशी केली आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही यंत्रणेला तिची ताब्यात देण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, ज्योतीकडे कोणतीही लष्करी, संरक्षण वा सामरिक माहिती असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आत्तापर्यंत समोर आलेले नाहीत. पोलिसांकडून जप्त केलेल्या उपकरणांचे विश्लेषण सुरू आहे.

Hisar Police clarify: No terror connection found with Jyoti Malhotra as per current investigation.
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे; शवविच्छेदन अहवालातील A to Z माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com