CM Revanth Reddy Sarkarnama
देश

Telangana : तेलंगणात रेड्डी सरकार; 1400 किलोमीटर पायी फिरलेल्या नेत्यालाही बक्षिसी

Rajanand More

Telangana Assembly Election : तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी गुरुवारी शपथ घेतली. त्यांच्यासह 11 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. निवडणुकीआधी राज्यातील 36 विधानसभा मतदारसंघांत पदयात्रा काढून काँग्रेसला ग्रामीण भागात मोठा जनाधार मिळवून दिलेल्या मल्लू भट्टी विक्रमार्क यांनाही बक्षिसी मिळाली आहे. त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे.

हैदराबादमधील एलबी स्टेडियमवर झालेल्या शपथविधी समारंभाला काँग्रेसच्या (Congress) नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 65 जागांवर विजय मिळवत के. चंद्रशेखर राव यांची सत्ता उलथवून टाकली. यामध्ये रेवंथ रेड्डी यांचा मोलाचा हातभार होता.

रेवंथ रेड्डी यांच्यासोबत आणखी 11 जाणांनी शपथ घेतली आहे. मल्लू भट्टी विक्रमार्क हे उपमुख्यमंत्री असतील. तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, मागील विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते. राज्यातील खम्माम जिल्ह्यातील 11 ते 12 मतदारसंघांवर त्यांचे वर्चस्व आहे. काँग्रेसच्या विजयासाठी त्यांनी घाम गाळला आहे. निवडणुकीआधी त्यांनी चार महिने पदयात्रा काढत 36 जिल्ह्यांतून 1 हजार 370 किलोमीटर प्रवास केला. त्याचाही काँग्रेसला मोठा फायदा झाल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले आणखी एक आमदार उत्तम कुमार रेड्डी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी सलग सात वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. 2021 पर्यंत ते प्रदेशाध्यक्ष होते. पक्षाचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

रेवंथ रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात श्रीधर बाबू, पूनम प्रभाकर, कोमटीरेड्डी वेकंट रेड्डी, दामोदर राजा नरसिंह, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, दना अनुसया, थुम्माला नागेश्वर राव, कोंडा सुरेखा आणि जुपल्ली कृष्णा राव यांचाही समावेश आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT