BJP MP : भाजपच्या दहा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा; दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश

Assembly Election : भाजपने विधानसभा निवडणुकीत तब्बल 21 खासदारांना तिकीट दिले होते.
Narendra Singh Tomar, Pralhat Patel, Rajyavardhan singh Rathore
Narendra Singh Tomar, Pralhat Patel, Rajyavardhan singh RathoreSarkarnama
Published on
Updated on

Election News : लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र निकालानंतर लगेचच भाजपच्या 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर या खासदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.

देशातील मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर झाले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने तब्बल 21 खासदारांना तिकीट दिले होते. त्यापैकी राजस्थानात 7 आणि मध्यप्रदेशात 7 तसेच तेलंगणामध्ये 3 आणि छत्तीसगडमधील 4 खासदारांचा समावेश होता.

Narendra Singh Tomar, Pralhat Patel, Rajyavardhan singh Rathore
Mizoram CM : मंत्री कोण, हे ठरवण्याचा अधिकार मला नाही! शपथ घेण्याआधी भावी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. तर तेलंगणामध्ये यावेळी चांगली कामगिरी करत 8 जागांवर विजय मिळवला आहे. या 21 खासदारांपैकी 12 खासदार विजयी झाले आहेत. या खासदारांनी बुधवारी आपल्या संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर या खासदारांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले.

बुधवारी 10 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. मात्र राजस्थानमधील अलवरचे बाबा बालकनाथ आमि छत्तीसगडच्या सरगुजा मतदारसंघाच्या खासदार रेणुका सिंह या दोघाचे राजीनामे अद्याप लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेला नाही. रेणुका सिंह हा केंद्रीय राज्यमंत्रीही आहेत.

Narendra Singh Tomar, Pralhat Patel, Rajyavardhan singh Rathore
Arvind Kejriwal : भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून अन् केजरीवालांनी काँग्रेस सरकारचीही लावली चौकशी

राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेलांचाही राजीनामा

विधासभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपने केंद्रीय मंत्र्यांनाही आखाड्यात उतरवले होते. त्यातील केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनीही संसदेच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येत घट होणार आहे.

या मंत्र्यासह मध्यप्रदेशातून खासदार राकेश सिंह,उदय प्रताप, रिती पाठक यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर छत्तीसगडमधून अरुण साव, गोमती साई, राजस्थानमधून राजवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, राज्यसभा सदस्य किरोडी लाल मीणा यांनी आज आपला राजीनामा सादर केला आहे.

(Edited By - Rajanand More)

Narendra Singh Tomar, Pralhat Patel, Rajyavardhan singh Rathore
Rajasthan Election : राजस्थानमध्ये पुन्हा निवडणुकीचे वारे; एका मतदारसंघासाठी तारखा जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com