Telangana Politics : तेलंगणामध्ये मागील आठवड्यात झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता. भाजपने तीनपैकी दोन जागा जिंकत चमत्कार घडवून आणला. तर सत्ता असूनही काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली. त्यानंतर मात्र काह दिवसांतच काँग्रेसने चार जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.
विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली होती. भारत राष्ट्र समितीचे चार आणि एमआयएमच्या एका आमदाराची मुदत संपल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी काँग्रेसने तीन तर सीपीआय आणि बीआरएसने प्रत्येकी एक उमेदवार दिला होता.
सध्याचे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ पाहता चार उमेदवार सहज निवडून येणार होते. मात्र, असे असूनही काँग्रेसने सीपीआयला एक जागा सोडली. या पाच उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयी घोषित करण्यात आले.
काँग्रेसकडून अभिनेत्री विजयशांती, अदानकी दयाकर, केठवथ शंकर नाईक यांना तर सीपीआयने नेलीकंती सत्यम आणि बीआरएसने श्रवण दासोजू यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेस आणि सीपीआयची विधानसभा निवडणुकीत आघाडी होती. त्यामुळे विधान परिषदेसाठीही काँग्रेसने सीपीआयला एक जागा सोडत आघाडी धर्म पाळला.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 65 जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. बीआरएसला केवळ 39 जागा मिळाल्या. तर भाजपला 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत बीआरएस आणि भाजपकडेही पुरेसे संख्याबळ नव्हते. चार आमदार निवृत्त होऊनही बीआरएसला केवळ एकच जागा मिळाली. त्यांचे तीन जागांचे नुकसान झाले आहे.
(25 वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर 1. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.