Delhi BJP News: होळीनिमित्त भाजपचं मोठे गिफ्ट: दिल्लीतील तळीरामांच्या हरियाणा, उत्तर प्रदेशातील चकरा थांबणार

Delhi Liquor Policy Update BJP Holi Gift for Delhi: केजरीवाल सरकारनं मद्य विक्री धोरणात काही विशिष्ट ब्रँड असलेल्या मद्यांनाच विक्रीसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे दिल्लीकरांना आपले आवडीचे मद्य घेण्यासाठी हरियाणा आणि उत्तर प्रदेशात जावे लागत होते.
Delhi Liquor Policy Update
Delhi Liquor Policy UpdateSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 14 March 2025: आम आदमी पक्षाची सत्ता हातातून जाण्यास निमित्त ठरलेलल्या मद्य विक्री धोरणात दिल्लीतील रेखा गुप्ता सरकारने मोठे बदल केले आहेत. होळीनिमित्त भाजपने दिल्लीतील तळीरामांना मोठ गिफ्ट दिलं आहे.

राष्ट्रीय राजधानीत मद्य विक्री करणाऱ्यासोबत महसूल विभागाची गुप्ता सरकारने बैठक घेतली. मद्य विक्री धोरणात मोठा बदल केला आहे. या बदलामुळे आता दिल्लीतील तळीरामांच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील चकरा थांबणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पार्टीला धूळ चारत भाजपनं दिल्ली ताब्यात घेतली आहे. अरविंद केजरीवाल सरकार ज्या मद्य विक्री धोरणामुळे घरी गेले, त्या धोरणात भाजपने बदल केला आहे.

केजरीवाल सरकारनं मद्य विक्री धोरणात काही विशिष्ट ब्रँड असलेल्या मद्यांनाच विक्रीसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे दिल्लीकरांना आपले आवडीचे मद्य घेण्यासाठी हरियाणा आणि उत्तर प्रदेशात जावे लागत होते.

Delhi Liquor Policy Update
Somnath Chatterjee: निष्ठा कुठं ठेवायची, हे त्यांच्याकडूनच शिकावं! असा लोकसभा अध्यक्ष होणे नाही...

गुप्ता सरकारने केलेल्या नव्या धोरणात आता दिल्लीतील मद्य विक्री दुकानावर सर्व ब्रँडचे मद्य विकण्याची परवानगी व्यावसायिकांनी मिळाली आहे. ग्राहकांच्या आवडीचे मद्य विक्री ठेवा, असा आदेश महसूल अधिकारी यांच्यासोबत मद्य विक्रेत्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे तळीरामांनी होळीच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करीत भाजपचे आभार मानले आहे.

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व ब्रॅंडचे मद्यांचा आवश्यक साठा करा, अशी सूचना बैठकीत महसूल विभागाने दिली. यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल, अशी आशा गुप्ता सरकार आणि महसूल अधिकाऱ्यांना आहे. महसुलाचे 6 लाख 400 कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे.

दिल्लीत सुमारे 700 मद्य विक्रीची दुकाने आहेत. बैकायदा मद्य विक्री रोखण्यासाठी आगामी काळात दुकानांची संख्या वाढविण्यात येणार आहे.आप सरकारच्या काळात मद्य विक्री धोरणावर दिल्लीकरांकडून झालेल्या टीकेपासून वाचण्याासाठी भाजपचा प्रयत्न आहे.

Delhi Liquor Policy Update
Jay Pawar Wedding: पवारांच्या घरी लवकरच सनई-चौघडा वाजणार; पाटलांची लेक होणार बारामतीची सुनबाई

गेल्या तीन वर्षात देशभरात दिल्लीचा कथित मद्य धोरण घोटाळा चर्चेचा विषय ठरला. दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू करण्यासाठी केजरीवाल सरकारनं मद्य कंपन्यांकडून बक्कळ पैशा घेतला, त्यांना दिल्लीत मद्य विक्रीची मोठी कंत्राटं दिली. यावरून भाजपनं निवडणुकीत आपच्या नेत्यांना आक्रमकपणे लक्ष्य केलं.

भाजपनं काळे फलक लावत केजरीवाल सरकारला जाब विचारला.त्याचा फटका निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर आपला बसला. तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सत्येंद्र जैन, खासदार संजय सिंह जेलमध्ये गेले. तर निवडणुकीत दिल्लीतील जनतेनं आप सरकारला घरचा रस्ता दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com