देश

होळीच्या दिवशी बांग्लादेशात मंदिराची तोडफोड; अनेकजण गंभीर जखमी

Bangladesh| Hindu| हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या बांग्लादेशातील एका संघटनेने या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.

सरकारनामा ब्युरो

ढाका : बांग्लादेशची (Bangladesh) राजधानी ढाका (Dhaka) येथील इस्कॉन मंदिरावर जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (१७ मार्च) ढाका येथील इस्कॉन मंदिरात घुसून जवळपास 150 लोकांच्या जमावाने मंदिराची तोडफोड केली. या जमावाने केवळ हल्लाच नाहीत तर मंदिराची लूटमार केल्याचेही समोर आले आहे.

हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या बांग्लादेशातील एका संघटनेने या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. ढाका येथील वारी मध्ये 222 लाल मोहन साहा स्ट्रीट येथील इस्कॉन राधाकांता मंदिरात सायंकाळी 7 वाजता हा हल्ला झाला. हाजी सैफुल्ला याच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक लोकांच्या जमावाने हा हल्ला केला. मंदिराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. या हल्ल्यात सुमंत्र चंद्र श्रवण, निहार हलदर, राजीव भद्र यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पोलिसांनाही या हल्ल्याची माहिती देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या हल्ल्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बांगलादेशात हिंदू मंदिरावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्या वर्षी नवरात्रीला हिंदूंविरोधात अफवा पसरवून दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. एवढेच नाही तर हिंदूंच्या घरांवर हल्ले झाले. त्याचवेळी ढाका येथील इस्कॉन मंदिरावरही हल्ला झाला.

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांवर काम करणाऱ्या AKS या संस्थेनुसार, बांगलादेशातील अल्पसंख्याकांना गेल्या 9 वर्षांत 3,679 हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान धार्मिक स्थळांची तोडफोड आणि सशस्त्र हल्ल्याची 1678 प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय हिंदू समाजाला लक्ष्य करून घरांची तोडफोड, जाळपोळ यासह वारंवार हल्ले होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT