TET Exam News Update: राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच जुन्या शिक्षकांच्या टीईटीबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे.
संसदेत टीईटी विधेयक मांडण्यात आले आहे. या विधेयकामुळे जुन्या शिक्षकांवरील अनिश्चितता दूर होणार आहे. हजारो जुन्या शिक्षकांच्या नोकरीवरील टांगती तलवार कायमची दूर होणार आहे.
टीईटी उत्तीर्ण होण्याबाबतचा निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून जुन्या शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) अनिवार्यतेबाबतचे विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्याला मंजूरी मिळाल्यावर देशातील वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना, टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनिवार्य अटीतून सूट मिळणार आहे.
२० ते २५ वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांच्या अनुभवाचा आदर राखत, सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक खासदारांनी यांनी नुकतीच केली होती.
'शिक्षण हक्क कायदा २००९' मधील कलम २३ आणि ३८ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांचा मुख्य रोख हा आधीपासून सेवेत असलेल्या शिक्षकांचे संरक्षण करणे हा आहे.
विधेयक मंजूर झाल्यावर जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होता आाली नाही, अशा शिक्षकांवर आता कोणतीही दंडात्मक कारवाई सरकारला करता येणार नाही. त्यांना सक्तीची निवृत्ती देणे, नोकरीतून कमी करणे किंवा त्यांचे सेवाविषयक फायदे रोखणे यांसारखी कठोर कारवाई करण्यावर कायद्याने बंदी करण्यात येईल.
नवीन कलम २३-अ नुसार, शिक्षकांच्या सेवा अटी, पदोन्नत आणि निवृत्तीवेतनाचे फायदे यामध्ये केवळ नवीन पात्रतेच्या अभावामुळे कोणताही बदल किंवा कपात केली जाणार नाही. जुन्या शिक्षकांचे वेतन आणि पदोन्नतीचे मार्ग पूर्वीप्रमाणेच मोकळे राहतील, असो या विघेयकात म्हटले आहे.
ज्या शिक्षकांची नियुक्ती या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी प्रचलित नियमांनुसार झाली आहे.
त्यांना आता 'टीईटी' किंवा तत्सम नवीन शैक्षणिक पात्रता धारण करणे बंधनकारक राहणार नाही.
नवीन पात्रता निकष हे केवळ भविष्यात होणाऱ्या नवीन नियुक्त्यांसाठीच लागू राहतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.