

Maharashtra Cooperative Bank Rule For Election: अनेक वर्ष जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना सहकार कायद्याच्या नव्या नियमाचा फटका बसला आहे. सहकारसम्राटांवर गंडांतर आले आहे. जिल्हा बँकेत वर्षानुवर्ष सत्ता भोगणाऱ्या बड्या नेत्यांना नव्या कायद्याने घरचा रस्ता दाखवला आहे.
बैंकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ ची अंमलबजावणीचे आदेश सरकारने दिला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये १० वर्षांहून अधिक काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक सहकारी बँकांमधील दीर्घकाळ सत्तेत असलेल्या संचालकांचे धाबे दणाणले आहे. आता त्यांना जिल्हा बॅँकेत नवा चेहरा द्यावा लागणार आहे.
अनेक वर्षांपासून बँकांच्या संचालक मंडळात दिग्गजांचे प्रस्थ या निर्णयामुळे कमी होणार आहे. यामुळे बँकांच्या आगामी निवडणुकांवेळीही राजकीय उलथापालथी होणार असून ग्रामीण राजकीय समीकरणे बदलणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर प्रस्थापित संचालकांच्या जागी नव्या चेहन्यांना संधी मिळणार आहे. बँकेला प्रगतिपथावर नेणान्या संचालकांना सत्तेतून बाहेर व्हावे लागणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नव्या कायद्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकार विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तसेच संबंधित बँकांनी तत्काळ आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात निर्देश देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे अनेक सहकारी बँकांमध्ये दीर्घकाळापासून सत्तेत असलेल्या संचालकांची गच्छंती होण्याची शक्यता व्यक्त होत असून आगामी निवडणुकांमध्ये मोठे राजकीय आणि सहकारी समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बैंकिंग कायदा अधिनियम २०२५ नुसार राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकांत दहा वर्षपिक्षा जास्त काळ संचालक राहिलेल्या व्यक्ती बँकेच्या पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरतील. राज्याच्या सहकार मंत्रालयाने सहकार आयुक्तांना या निर्णयाव्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
२०२५ मध्ये होणाऱ्या आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुकांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
हा कायदा राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCB) आणि राज्य सहकारी बँकेला (MSCB) लागू असेल.
ज्या बँकांच्या निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहेत किंवा प्रलंबित आहेत, त्यांनाही हे निकष पाळावे लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.