Kangana Ranaut- Sanjay Raut Sarkarnama
देश

Sanjay Raut On Kangana Ranaut : कंगना रनौत मारहाण खासदार राऊतांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आईबद्दल बोलल्यावर राग..!

Chaitanya Machale

Kangana Ranaut News : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका महिला कॉन्स्टेबलने कानशिलात मारली. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या महिला 'कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा घेतला. मात्र एका खासदारावर अशा पद्धतीने हाच उचलणं योग्य नाही', असे राऊत म्हणाले.

चंदीगड विमानतळावर गुरूवारी हा प्रकार घडला होता. अभिनेत्री कंगना रनौत विमानामध्ये चढण्याच्या अगोदर सुरक्षा तपासणीच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. सीआयएसएफ कॉन्स्टेबलने अभिनेत्रीला कानशिलात लगावली. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना अभिनेत्री कंगनाकडून वादग्रस्त विधान करण्यात आले होते. या शेतकऱ्यांमध्ये (Farmer) या कॉन्स्टेबलची आई देखील होती. या आंदोलनाचा उल्लेख कंगनाकडून खलिस्तानी असा केला गेला होता. यावरून संबंधित महिला गार्डने कंगनाशी वाद घातला. त्यानंतर थेट कंगनाच्या कानशिलात लगावल्याची चर्चा सोशल मीडियात होती. या घटनेनंतर कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती.

सोशल मीडियावर (Social Media) याबाबतचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेनंतर विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या जात होत्या. या घटनेची गंभीर दखल घेत कानशिलात लगावणाऱ्या संबधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या घटनेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आईबद्दल कोणी चुकीचे म्हणाल्यावर राग येणारच, असे राऊत म्हणाले.

या कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा घेतला. मात्र अशा पद्धतीने एका खासदारावर हात उचलणे योग्य नाही, असे राऊत म्हणाले. मला कंगनाविषयी सहानुभूती आहे. त्या खासदार आहेत आणि खासदारावर अशा पद्धतीने हात उचलला नाही पाहिजे.कंगनाने मुंबईला पाकिस्तान म्हंटले होते, तेव्हासुद्धा लोकांचा त्याचा प्रचंड राग आला होता. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात या महिला कॉन्स्टेबलची आई होती, असे स्पष्टीकरण दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल आदर ठेवला पाहिजे. आंदोलनात सहभागी असलेल्या आईबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर नक्कीच लोकांच्या मनात राग येतो, संताप येतो, चीड येते असे खासदार राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT