Thalapathy Vijay Karur Rally Stampede : अभिनय क्षेत्रातून आता राजकारणात प्रवेश केलेला तमिळ अभिनेता थलापथी विजय याच्या तामिळनाडूती करूर येथील सभेत मोठी दुर्घटना घडली आहे. या सभेच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत एकूण 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेतील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या पीडितांवर रुग्णालयात योग्य उपचार होत आहेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. अभिनेता थलपती विजय याने तमिझगा वेत्री कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली असून तामिळनाडूतील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर त्याने काल करूर येथे सभा आयोजित केली होती. या सभेसाठी जवळपास 30 हजारहांहून अधिक लोक उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय गर्दी पोलिसांना कंट्रोल होत नसल्याचं समजताच आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच विजयने त्याचं भाषण मध्येच थांबवलं आणि पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
मात्र, आता ही चेंगराचेगरी नेमकी कशामुळे झाली याबाबतची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता थलपथी विजयच्या रॅली दरम्यान त्याच्या बसमधून लोकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यास सुरुवात केली. लोकांनी त्या बाटल्या घेण्यासाठी बसकडे धाव घेतल्यामुळे अचानक चेंगराचेंगरी झाली.
याच चेंगराचेंगरीमुळे मोठी दुर्घटना झाली. तर काही लोकांच्या म्हणण्यांनुसार, सभेसाठी मोठी गर्दी जमली आणि कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरू झाल्याने गर्दी आणखी वाढल्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अनेकजण बेशुद्ध पडले आणि काही लोकांचा मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.