
Vijay Rally Stampade: अभिनेता-नेता थलापती विजय याच्या तामिळनाडूच्या करुर इथं काढलेल्या रॅलीला तुफान गर्दी झाली असून यामध्ये चेंगराचेंगरी होऊन ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेक जण जखमी झाले असून काहीजण बेपत्ता झाल्याचीही माहिती मिळते आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमींना सर्व मदत पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसंच ते उद्या करुर इथं घटनास्थळी भेट देणार आहेत.
तामिळनाडूच्या करुर इथं शनिवारी प्रसिद्ध अभिनेता आणि तमिलगा वैत्री कझगम (टीव्हीके) या राजकीय पक्षाचा प्रमुख विजय याच्या रॅलीमध्ये अचानक गोंधळ झाला. मोठ्या गर्दीमुळं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊन लोक एकमेकांच्या अंगावर पडले आणि त्यात दोन लहान मुलांसह सुमारे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जवळच्या रुग्णालयातही जखमींना आणल्यानंतर मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
या रॅलीत गर्दी इतकी प्रचंड झाली होती की पोलिसांना देखील ती नियंत्रित होत नव्हती, शेवटी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. ही परिस्थिती पाहून विजयनं आपलं भाषण मध्येच थांबवलं आणि त्यानं व्यासपीठावरुन पोलिसांना आवाहन केलं की त्यांनी गर्दी नियंत्रित करायला मदत करावी. यावेळी विजयच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांना पाण्याच्या बाटल्या देखील वाटल्या. पण तरीही परिस्थिती बिघडत गेली.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आरोग्य मंत्री सुब्रमण्यम आणि जिल्हा कलेक्टर यांना तात्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच अंबिल महेश यांनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. तसंच सरकारी सुत्रांना रुग्णालय प्रशासनाला आपत्कालीन स्थितीत सहाय्य करण्याचा अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सातत्यानं संपर्कात राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.