Tamil Nadu Assembly Election 2026 : देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची काही तासांत मतमोजणी होत आहे. तत्पूर्वी विजयाचे दोन्ही बाजूने दावे केले जात आहेत. अभिनयाच्या पडद्यावरून, थेट तामिळनाडूच्या राजकारणात 'टीव्हीके' पक्षाची स्थापना करत अभिनेता थलपती विजय यांनी दमदार एन्ट्री घेतली आहे.
थलपती विजय नुकताच शिर्डी इथं साईचरणी हजेरी लावताच, 'टीव्हीके' पक्षाचे मुख्य समन्वयक के. ए. सेंगोट्टीयान यांनी 180 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. 'टीव्हीके'च्या या दाव्यामुळे सत्ताधारी डीएमके पक्षाचं टेन्शन वाढवलं आहे.
तमिळनाडू विधान सभा निवडणुकीमध्ये (Assembly Election) अभिनेता विजय यांचा ‘टीव्हीके’ पक्ष 234 पैकी 180 जागा जिंकेल, असा दावा ‘टीव्हीके’चे मुख्य समन्वयक के. ए. सेंगोट्टीयान यांनी केला. तमिळनाडूमध्ये तिरंगी लढत होत असून, काही कलचाचण्यांमध्ये ‘टीव्हीके’ला 98 ते 120 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काही चाचण्यांमध्ये या पक्षाला जेमतेम यश मिळेल, असे म्हटले आहे. ‘राज्यात सर्वत्र ‘टीव्हीके’ची चर्चा होत असून, अशी परिस्थिती कधीही दिसली नव्हती. या निवडणुकीत आमचा ऐतिहासिक विजय होईल,’ असे सेंगोट्टीयान यांनी म्हटले आहे. 'टीव्हीके' पक्षाचे प्रमुख अभिनेता थलपती विजय यांनी नुकताच शिर्डी (Shirdi) इथं येत, साईचरणी हजेरी लावली होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे डीएमके पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि निकालाविषयी चर्चा केली. मतदानानंतर स्टॅलिन चार दिवसांच्या सहलीवर गेले होते.
तेथून परतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सेल्वापेरुंथगाई, केएमडीकेचे सरचिटणीस ई. आर. ईश्वरन यांचा समावेश आहे.
थलपती विजय यांच्या 'TVK' पक्षाची तामिळनाडूच्या राजकारणात स्वतंत्र वाटचाल सुरू आहे. विजय यांनी DMKला 'राजकीय शत्रू' आणि भाजपला 'वैचारिक शत्रू' घोषित केले आहे. तरुणांमध्ये विजय यांची प्रचंड लोकप्रियता असून, ते प्रस्थापित पक्षांची मते खाण्याची दाट शक्यता आहे.
भाजपने विजय यांना सोबत घेण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. भाजपने त्यांना 80 जागा आणि उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. विजय यांच्याकडे असणारी तमिळ तरुणांची ताकद आणि चाहत्यांची मोठी फळी मतांचे समीकरण बदलू शकते. तथापि, विजय यांनी अद्याप तरी 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली असून, त्यांनी भाजपच्या उजव्या विचारधारेला कडाडून विरोध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.