Ro Khanna, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल; भारतीय वंशांचे खासदार, पंतप्रधान मोदींना म्हणाले...

Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात देशभरातले वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi News : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरील कारवाईविरोधात देशभरातले वातावरण तापले आहे. आता या प्रकरणाची दखल भारताबाहेरही घेतली जाऊ लागली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी ही कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

खन्न यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये खन्न म्हणाले, राहुल गांधींची संसद सदस्यता रद्द करणे हा गांधीवाधी विचारसरणी आणि भारताच्या मूल्यांसोबत केलेला विश्वासघात आहे. माझ्या आजोबांनी ज्यासाठी आयुष्याची अनेक वर्ष तुरुंगात घालवली तो हा भारत नाही, असे खन्न यांनी म्हटले आहे. खन्ना हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिलिकॉन व्हॅलीचे प्रतिनिधित्व करतात.

सर्व चोराचे आडनाव मोदी कसे? असा सवाल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये केला होता. याप्रकरणी राहुल यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना सुरत येथील सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच त्यांचे संसदेतले सदस्यत्व रद्द करण्यात आले.

खन्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. खन्ना यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे, त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टॅग करून म्हटले आहे की, भारतीय लोकशाहीच्या हितासाठी तुमच्याकडे हा निर्णय बदलण्याची ताकद आहे., असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT