Banks NPA News
Banks NPA News Sarkarnama
देश

Banks NPA News : पाच वर्षांत बँकांचे तब्बल १० लाख कोटी कर्ज माफ; 'या' बँकांचा समावेश

सरकारनामा ब्यूरो

Banks NPA News : गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने बँकांची तब्बल १० लाख कोटी रुपयांची कर्ज माफ केली आहेत. याबाबतची बातमी इंडियन एक्सप्रेस दिली असून ही माहिती रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने माहिती अधिकारात दिली असल्याचे समोर आले आहे. मागील 5 वर्षात बँकांनी दिलेल्या कर्जापैकी फक्त १३ टक्के अर्थात १ लाख ३२ हजार ०३६ कोटी रूपयांचं बुडीत कर्ज वसूल करण्यात बँकांना यश आलंय.

गेल्या पाच वर्षात १० लाख ९ हजार ५१० कोटी रूपयाचं कर्ज राईट ऑफ करण्याची वेळ बॅंकांवर आली आहे. तर गेल्या १० वर्षात १३ लाख २२ हजार ३०९ कोटीचं कर्ज राइट ऑफ करण्यात आलं आहे. गेल्या १० वर्षाच्या कालावधीचा विचार करता मागील ५ वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक कर्ज राइट ऑफ करण्यात आलं आहे. त्यामध्ये खाजगी बॅंकांचा विचार केला असता आयसीआयसीआय (ICICI) बँकेंने सर्वात जास्त ५० हजार ५१४ कोटी रूपये राइट ऑफ केले आहे.

सरकारने देशातील अनेक बँकांची कर्ज राईट ऑफ केली आहेत. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा, यूको बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बॅंक यासह आणखी काही खासगी बँकांचा त्यामध्ये सहभाग आहे. तर ''बँकांचे कर्ज राईट ऑफ केल्यामुळे बँकांची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे'', असं भाष्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी या केलं आहे.

राइट ऑफ म्हणजे काय?

बँकांचे कर्ज राईट ऑफ करणे म्हणजे अशी कर्ज जी वसूल झाली नाहीत. ती कर्ज राइट ऑफ केली जातात. बँका आपली बॅलन्स शीट व्यवस्थित करण्यासाठी हे कर्ज राइट ऑफ करतात. मात्र कर्ज राइट ऑफ केले तरीही या कर्जाची वसुली करण्याचे प्रयत्न बॅंका सुरूच ठेवतात. या पार्श्वभूमीवर गेल्या ५ वर्षात तब्बल १० लाख कोटी रुपयांच कर्ज राईट ऑफ करण्यात आलं आहे.

पाच वर्षात कोणत्या बॅंकेचं किती कर्ज राइट ऑफ केलं? :

गेल्या ५ वर्षात देशातील अनेक बॅंकेचं कर्ज राइट ऑफ करण्यात आलं आहे. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच एकूण ७ लाख ३४ हजार ७३८ कोटी रूपयांचं कर्ज राइट ऑफ करण्यात आलं. तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे २ लाख ४ हजार ४८६ कोटी रूपये, तर पंजाब नॅशनल बॅंकेचे ६७ हजार २१४ कोटी रूपये, तर बॅंक ऑफ बडोदाचे ६६ हजार ७११ कोटी रूपये, तर खाजगी बॅंकांचा विचार केला तर आयसीआयसीआय (ICICI) बॅंकेंने सर्वात जास्त ५० हजार ५१४ कोटी रूपये राइट ऑफ केले आहेत.

कोणत्या वर्षात किती कर्ज राइट ऑफ केलं?

२०१२ : १३- ४२ हजार २३५ कोटी रूपये

२०१३ : १४ - ३२ हजार ९९२ कोटी रूपये

२०१४ : १५ - ५८ हजार ७८६ कोटी रूपये

२०१५ : १६ - ७० हजार ४१३ कोटी रूपये

२०१६ : १७ - १ लाख ०८ हजार ३७३ कोटी रूपये

२०१७ : १८ - १ लाख ६१ हजार ३२८ कोटी रूपये

२०१८ : १९- २ लाख ३६ हजार २६५ कोटी रूपये

२०१९ : २० - २ लाख ३४ हजार १७० कोटी रूपये

२०२० : २१ - २ लाख ०२ हजार ७८१ कोटी रूपये

२०१२ : २२ - १ लाख ७४ हजार ९६६ कोटी रूपये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT