Nitin Gadkari : शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच वादग्रस्त विधान; गडकरी स्पष्टच बोलले...

Nitin Gadkari News : ''आई-वडिलांपेक्षाही आमची जास्त निष्ठा...
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari News: ''छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, आई-वडिलांपेक्षा आमची जास्त निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे'', असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. गडकरींनी याबबतचा आपल्या ट्विटरवरून एक ३० सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरात वादंग उठलं. यानंतर आता भाजप नेते नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) व्हिडिओ शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Nitin Gadkari
निवडणूक गुजरातमध्ये, मात्र सुट्टी मिळणार महाराष्ट्रातील 'या'चार जिल्ह्यात...

गडकरी व्हिडिओमध्ये म्हणतात, ''छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, आई-वडिलांपेक्षा आमची जास्त निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे. कारण त्यांचं जीवन आमचा आदर्श आहे. ''यशवंत किर्तीवंत! वरदवंत! सामर्थ्यवंत! जाणता राजा, निश्चयाचा महामेरू! बहुत जनांसी आधारू! अखंड स्थितीचा निर्धारू! श्रीमंत योगी.'' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत ''वेळ पडली तर आपल्या मुलाला देखील कठोर शिक्षा देणारा आमचा राजा होता," असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Nitin Gadkari
Rahul Gandhi : 'आदिवासीच देशाचे खरे मालक; भाजपवाले त्यांना 'वनवासी' बनवताहेत...'

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी आक्रमक होत राज्यपालांवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) व्हिडिओ शेअर करत ''छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com