Dhairyasheel Mane and Modi
Dhairyasheel Mane and Modi  Sarkarnama
देश

Dhairyasheel Mane : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत धैर्यशील मानेंची थेट पंतप्रधानांकडे तक्रार; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Karnataka Border Dispute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून दोन्ही राज्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवरच शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनाच्या माध्यमातून धैर्यशील माने यांनी सीमावादाच्या प्रश्नावर बसवराज बोम्मईं यांच्याविरोधात थेट मोदींकडेच तक्रार केली आहे. तर आपणच मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील धैर्यशील मानेंनी मोदींकडे केली आहे.

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या शिष्टाईनंतर देखील अशा पद्धतीचे विधानं होत असतील तर ते चुकीचे असल्याचं मानेंनी पत्रात म्हटले आहे.

धैर्यशील माने यांनी सीमाभागात जाताना माझ्यासह काही मंत्र्यांना अडवण्यात आलं असल्याचाही उल्लेख यावेळी त्यांनी केला. तसेच कर्नाटकमध्ये जाण्यासंदर्भात अधिवेशन संपलं की लवकरच आम्ही नवीन तारीख जाहीर करू, असंही माने यांनी म्हटले.

त्याचबरोबर वाढत्या महागाईचा विचार करता उसाच्या दरामध्ये वाढ करण्यात यावी, याबाबतचे पत्र देखील त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांना दिले. त्याच बरोबर दोन कारखान्यांमध्ये हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी, तसेच झारखंडमधील जैन तिर्थ क्षेत्राबाबतही योग्य निर्णय घेण्यात यावा, असंही त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. धैर्यशील माने यांनी आज पत्नी आणि मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT