Shrikant Shinde :  Narendra Modi :
Shrikant Shinde : Narendra Modi :Sarkarnama

Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवाचा लळा!

Shrikant Shinde : रुद्रांश सोबत मोदीजींनी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्याला आशीर्वाद दिले.

Narendra Modi : दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत उपस्थित आहेत. या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्नी व मुलासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याची माहिती खुद्द श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करून दिले आहे. मोदींसोबतचे काही खास फोटो ही त्यांनी शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत मोदी आणि मुख्यमंत्री यांचे नातू रमताना दिसत आहेत.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर ट्विट केले आहे. ट्विट करत श्रीकांत शिंदे म्हणाले, "जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे, त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हा जेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात.आजही असंच झालं! मोदीजी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली आणि माझा मुलगा चि.रुद्रांश सोबत मोदीजींनी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्याला आशीर्वाद दिले.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी दिलेला खाऊचा रुद्रांशने देखील हास्यमुखाने आनंदाने स्विकार केला, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Shrikant Shinde :  Narendra Modi :
Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; या भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची देखील विचारपूस करित, कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीकांत शिंदेंनी गणेशाची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कारही केला.

Shrikant Shinde :  Narendra Modi :
Nitin Gadkari : गरीबांच्या पैशातून हिंदुस्तानचे इंफ्रास्ट्रक्चर उभारणार; गडकरीचा निर्धार!

दरम्यान, यापूर्वीही खासदार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पत्नी व मुलांसह सहकुटुंब सदिच्छा भेट दिली होती. या सदिच्छा भेटीचे फोटोही त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केले होते. यावेळी अमित शहा यांनी शिंदेची आस्थेने विचारपूस केली होती. या भेटीची चर्चा ही माध्यमात झाली होती. या महत्त्वपूर्ण भेटींमुळे शिंदे कुटुंब आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वात संबंध दृढ आहेत, हेच अधोरेखित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com