Omar Abdullah, Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : पाकिस्तानकडून काँग्रेस-NC ची पोलखोल! पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रहार

Congress National Conference Alliance Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारसभा घेत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर टीकास्त्र डागले.

Rajanand More

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेत काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात पुन्हा कलम 370 येऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

काँग्रेस आणि एनसीच्या आघाडीने राज्यात पुन्हा कलम 370 आणणार असल्याचे म्हटले आहे. त्याला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी समर्थन दिले आहे. त्याचे पडसाद जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीत उमटत आहेत. पंतप्रधानांनीही त्याचा चांगलाच समाचार घेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

कटरा येथील प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेस-एनसीचे उघडपणे समर्थन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कलम 370 आणि 35 ए बाबत काँग्रेस आणि एनसीचा आणि पाकिस्तानचा अजेंडा सारखाच आहे. म्हणजेच काँग्रेस-एनसीची पाकिस्ताननेच पोलखोल केली आहे. शेजारचा देश त्यांच्याबाबतीत उत्साही आहे.

पाकिस्तानात काँग्रेस-एनसी आघाडीची बल्ले-बल्ले होत आहे. त्यांच्या जाहीरनाम्यामुळे पाकिस्तान खूप प्रभावित झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसचा शाही परिवार भ्रष्टाचाराचा जन्मदाता असल्याची टीका करत मोदी म्हणाले, काँग्रेसच्या उत्तराधिकाऱ्यांनी (राहुल गांधी) विदेशात जाऊन आमचे देवी-देवता भवगान नाहीत, असे म्हटले आहे. हा आमच्या आस्थेचा अपमान आहे. त्यासाठी काँग्रेसला दंड द्यायला हवा.

काँग्रेस मोहब्बत की दुकान लावत द्वेष विकत आहे. हेच त्यांचे धोरण आहे. दिल्ली ते जम्म-काश्मीरपर्यंत हे लोक गडबडून गेले आहेत. कसेही करून खुर्ची मिळवायची आणि तुम्हाला लुटायचे, हा आपला हक्क असल्याचे त्यांना वाटत आहे. लोकांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवणे हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यांनी फक्त अराजकता दिली आहे. आता त्यांच्या षडयंत्रात कुणी सापडणार नाही, असा निशाणा मोदींनी साधला.

राज्यात तीन कुटुंबांनी 80 दशकांत काय केले, असा सवाल करत मोदी म्हणाले, सत्तेला त्यांनी आपली संपत्ती समजले होते. दुसऱ्या कुणालाही पुढे येऊ देत नाहीत. कधीकाळी लाल चौकात येऊन तिरंगा फडकावणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे होते. वर्षानुवर्षे लोक लाल चौकात यायला घाबरत होते. पण आता चित्र बदलले आहे. श्रीनगरच्या बाजरांमध्ये आता ईद आणि दिवाळीचा उत्साहही दिसतो, असे मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT