Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून खल सुरू असतानाच, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरील सुनावणीचीही ठाकरे गटाला प्रतीक्षा आहे. मात्र, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी वारंवार लांबणीवर जाताना दिसत आहे. पुन्हा एकदा ही सुनावणी आता लांबलेली दिसत आहे, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आता दिवाळीच्या सुट्ट्यानंतर सुनावणी होणार आहे. यामुळे दिवाळीच्या फटाके फुटल्यानंतरच आता शिवसेना पक्षाबाबतचा धमाका होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर आता दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर २० नोव्हेंबरला ही सुनावणी होणार आहे. याबाबत उद्धव ठाकरे गटाकडून पक्षाच्या दाव्यावर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल आहे.
ठाकरे गटाच्या या याचिकेवर खरंतर ३१ ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. मात्र त्या दिवशी इलेक्ट्रोल बाँड्सबाबत दिवसभर सुनावणी होणार असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते. या प्रकरणी अनेक महिन्यांपासून सुनावणी झाली नव्हती. आता २० नोव्हेंबरला तरी सुनावणी होती का? हे पाहणे महत्वाचं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णय दिल्यानुसार शिवसेना आता शिंदे गटाची आहे. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केले गेले आहे. याच निर्णयाविरोधात आता ठाकरे गटाने याचिका दाखल केले आहे. यावर आता दिवाळीनंतरच निर्णय हे स्पष्ट झाले आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.