Caste Survey Sarkarnama
देश

Bihar Caste Survey : हिंदूंची संख्या घटली, तर मुस्लिमांचा... ; काय सांगते २०११ ते २०२३ ची आकडेवारी ?

Bihar Caste Census : बिहारमधील हिंदू आणि मुस्लिमांच्या संख्येत 11 वर्षांत मोठा बदल झाला आहे.

अनुराधा धावडे

Bihar Caste Survey Report : बिहारच्या नितीश कुमार सरकारने बिहारमधील जात सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली आहे. अहवालात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्धांसह राज्यातील सर्व धर्म आणि जातींच्या लोकसंख्येची आकडेवारी सादर केली आहे. शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्या अहवालाची आकडेवारी आणि ताज्या अहवालावर नजर टाकली, तर हिंदू आणि मुस्लिमांच्या संख्येत थोडा फरक आहे.

अहवालातील आकडेवारीनुसार, हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये थोडीशी घट झाली आहे, तर मुस्लिमांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2011 ते 2023 या काळात बिहारमध्ये हिंदूंची संख्या 0.8 टक्क्यांनी कमी झाली असून, मुस्लिमांची संख्या 0.8 टक्क्यांनी वाढली आहे. या 11 वर्षांत मुस्लिमांची लोकसंख्या तुलनेने वाढली आहे.

2011 आणि 2023 ची आकडेवारी ?

2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये हिंदूंची संख्या 81.9 टक्के होती, तर 2023 मध्ये ही संख्या 82.7 टक्के झाली आहे. दोन अहवालांमध्ये 0.8 टक्के इतकी आहे, तर अहवालानुसार 2023 च्या अहवालात ही संख्या 16.9 टक्के होती, जी २०२३ मध्ये मुस्लिमांची संख्या 17.7 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच यात 0.8 टक्क्यांचा फरक आहे.

बिहार कास्ट सर्वेक्षण डेटा

हिंदू- 81.9%

मुस्लिम- 17.7%

ख्रिश्चन- 0.05%

शीख- 0.01%

बौद्ध- 0.08%

जैन- 0.009%

इतर- 0.12%

2011 च्या जनगणनेचा डेटा

हिंदू- 82.7%

मुस्लिम- 16.9%

ख्रिश्चन- 0.12%

शीख- 0.02%

बौद्ध- 0.02%

जैन- 0.02%

इतर- 0.1%

ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन समुदायांची संख्या

ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन समुदायांचे आकडेही अहवालात दिले आहेत. त्यानुसार ख्रिश्चन, शीख आणि जैन समाजाची लोकसंख्या घटली आहे. (Bihar) 2023 च्या अहवालात शीख, ख्रिश्चन आणि जैन यांची संख्या अनुक्रमे 0.01 टक्के, 0.05 टक्के आणि 0.009 टक्के आहे, तर 2011 च्या अहवालानुसार, तीन धर्मांच्या लोकांसाठी ही संख्या अनुक्रमे 0.02 टक्के, 0.12 टक्के आणि 0.02 टक्के होता.

अहवालात पूर्वीच्या तुलनेत ख्रिश्चनांची लोकसंख्या 0.7 टक्के, शिखांची संख्या 0.01 टक्क्यांनी आणि जैन समाजाच्या लोकांची संख्या 0.011 टक्क्यांनी घटली आहे. याशिवाय 2011 मध्ये बौद्ध धर्माची लोकसंख्या 0.02 टक्के होती, ती 2023 मध्ये 0.08 टक्के झाली, तर इतरांची संख्या 2011 मध्ये 0.1 टक्के होती, जी 2023 मध्ये 0.12 टक्के होईल.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT