Shatrughan Sinha Sarkarnama
देश

Rahul Gandhi News: राहुल गांधींवरील कारवाईमुळे विरोधक एकवटले; बैठकीला तृणमूलची हजेरी; सिन्हांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Trinamool Congress News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत आज तृणमूल काँग्रेस पक्षही सहभागी झाला.

सरकारनामा ब्यूरो

Shatrughan Sinha News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत आज तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षही सहभागी झाला. तृणमूलचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर झालेल्या कारवाईवर चर्चा झाली.

या विषयी बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. सिन्हा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, त्यांच्यामुळेच आज संपूर्ण विरोधक एकत्र आले आहेत. आम्ही पंतप्रधानांचे यासाठी आभारी आहोत, कारण त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाने केलेल्या कृतींमुळे, विरोधकांची किमान एकजूट झाली, हे 2024 साठी चांगले आहे, विशेषत: येत्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.

आता सर्वजण 2024 पूर्वी विचारधारेच्या पातळीवर एकत्र येत आहेत. भाजपसाठी (BJP) आधीच कठीण काळ होता, कारण ते कोणत्याही गोष्टींना उत्तर देत नाहीत. ते फक्त सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. विरोधी पक्षाच्या लोकांचाच छळ होत आहे. विरोधकांवरच गुन्हे दाखल झाले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. सीबीआय आणि ईडीच्या गुन्हांचा दर 10 पैकी 1 देखील नाही, असा हल्लाबोल सिन्हा यांनी केला.

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाईचा प्रकार आता अती झाला आहे. फक्त भाजपच्या नेत्यांना धुतले जाणारे हे कसले वॉशिंग मशीन आहे? हे सर्वसामान्यांनाही समजू लागले आहे. त्यांच्या सर्व कारवाया आणि राहुल गांधींची क्रांतिकारी 'भारत जोडो यात्रा' पाहता, काँग्रेसला संधी आहे. 2024 मध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या टीममुळे विरोधकांच्या 100 जागा वाढतील, असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT