Chandrakant Khaire News : सुषमा अंधारे तुमचीचं लफडी मतदारसंघात येवून बाहेर काढतील..

Marathwada : आपण आधी काय होतो, आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे काय झालो? हे एकदा तपासून पाहिलं पाहिजे.
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire NewsSarkarnama

Shivsena : आमदार संजय शिरसाट हे मंत्रीपद न मिळाल्याने अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे ते काहीही बोलतात. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. प्रखर भाषण करतात, कायद्याने बोलतात म्हणून यांची टरकली आहे. एखाद्या महिलेबद्दल लफडे वगैरे भाषा वापरणं यांना शोभत नाही. उलट मतदारसंघात येवून सुषमा अंधारे (Sushama Andhare) तुमचीचं लफडी बाहेर काढतील, असा इशारा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना दिला.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News
Ambadas Danve News : मंत्रीपद मिळत नसल्याने शिरसाट वैफल्यग्रस्त, मी कधीही त्यांना फोन केला नाही..

अंधारे यांच्याबद्दल काय लफडे आहे, असे म्हणतात, पण तुमची किती लफडी आहेत, हे बाहेर काढले तर काय होईल? त्यापेक्षा मिळालेल्या खोक्याचे पैसे आहेत, त्यात शांत बसा असा टोला देखील खैरे (Chandrakant Khaire) यांनी लगावला. शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर त्यांची नक्कल करत टीका केली होती.

यावरून शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. चंद्रकांत खैरे यांनी तर शिरसाट यांची किती लफडी आहेत, ती बाहेर काढली तर काय होईल? असे म्हणत या वादात उडी घेतली आहे. खैरे म्हणाले, शिरसाट यांनी आपण आधी काय होतो, आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे काय झालो? हे एकदा तपासून पाहिलं पाहिजे.

गद्दारी करून तुम्ही पन्नास खोके कमावले आहेत, त्यामुळे आता शांत बसलं पाहिजे, कशाला उद्धव ठाकरे व इतर नेत्यांवर टीका करता. अंधारेताई या आमच्या उपनेत्या आहेत, प्रखर, मुद्देसूद आणि कायदेशीर पद्धतीने त्या बोलतात म्हणून तुमची टरकली आहे. याच सुषमा अंधारे उद्या तुमच्याच मतदारसंघात येवून तुमची लफडी बाहेर काढतील, असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com