Abdel Fattah El-Sisi, latest News
Abdel Fattah El-Sisi, latest News Sarkarnama
देश

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 'या' मुस्लिम देशाचे राष्ट्रपती असतील प्रमुख पाहुणे...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सीसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात इजिप्तला दिलेल्या भेटीदरम्यान अब्देल फतेह अल-सीसी यांना भारताकडून आमंत्रण दिले होते. त्यामुळे 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पहिल्यांदाच इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान्, यावर्षी दोन्ही देशांनी राजनैतिक संबंधांचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला आहे.गेल्या महिन्यात, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या दौऱ्यात राष्ट्रापती अल-सिसी यांची भेट घेतली होती. (Abdel Fattah El-Sisi, latest News)

परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले की, 2022-23 मध्ये भारताच्या G-20 च्या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात म्हटले की, "भारत आणि इजिप्तमध्ये नागरिकांच्या संबंधांवर आधारित मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

2021 मध्ये तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र ब्रिटनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला होता.यंदा मात्र कोरोना प्रादुर्भावाची भीती नसल्याने भारताने पाच मध्य आशियाई प्रजासत्ताकांच्या नेत्यांना प्रजासत्ताक दिन (Republic Day) सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते.

त्याच वेळी,2018 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात, दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (ASEAN) सर्व 10 देशांचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित होते. 2020 मध्ये,ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे होते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (2015), रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (2007), फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी (2008) आणि फ्रँकोइस ओलांद (2016) हे देखील यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT