पंतप्रधान मोदींनी दोन तास नीट काम केले तरी देशातील महागाई कमी होईल...

Arvind-kejriwal : पंतप्रधानांचे १८ तास चिखलफेकीतच जातात...
Arvind-kejriwal, PM Narendra Modi Latest News
Arvind-kejriwal, PM Narendra Modi Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली :‘माननीय पंतप्रधान, तुम्ही १८ तास काम करता, पण संपूर्ण वेळ चिखलफेक करत असता.(तुम्ही) दोन तासही नीट काम केले तर देशातील महागाई कमी होईल, असा जोरदार हल्लाबोल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (ता.२६ नोव्हेंबर) केला.

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या, भाजपने (BJP) समोर आणलेल्या नवीन व्हिडिओवर बोलताना "केजरीवालांची जनकल्याणाची १० कामे हवीत की भाजपचे असले १० व्हिडिओ हवेत हे दिल्लीचे लोक ठरवतील," असा पलटवारही केला. (Arvind-kejriwal, PM Narendra Modi Latest News)

Arvind-kejriwal, PM Narendra Modi Latest News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठी माणसांसाठी गुवाहाटीतून मोठी घोषणा

ईडीच्या ३ हजार पानांच्या आरोपपत्रात देखील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव नाही. शिक्षण क्रांतीच्या माध्यमातून जगभरात भारताचा नावलौकिक मिळवणाऱ्या सिसोदियांना खोट्या प्रकरणात अडकवल्याबद्दल मोदींनी देशाची माफी मागायला नको का? चांगले काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकून देशाची प्रगती होईल का? अशाने देश पुढे जाईल का?,असा सवालही केजरीवाल यांनी विचारले आहेत.

केजरीवाल (Arvind kejriwal) आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, सिसोदिया यांचे घर,गाव,बँक सर्वत्र छापे टाकण्यात आले,मात्र सीबीआय, ईडीला (ED) त्यात काहीही मिळाले नाही. आता तपास सुरू असल्याचे सांगत या यंत्रणा पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहेत. पंतप्रधान आयुष्यभर आमची चौकशी करत राहतील. पण आमच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान स्वतः या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. आज मी छातीठोकपणे सांगतो की, आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. आमच्याविरुद्ध काहीही सापडलेलेच नाही.

Arvind-kejriwal, PM Narendra Modi Latest News
Sarpanch : ऐकावं तर नवलचं : गावकऱ्यांचे असेही प्रेम ; नवनियुक्त सरपंचासाठी ११ लाखाचा हार !

दरम्यान, मंत्री जैन यांचा तिहार तुरुंगातील एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या जैन यांच्यासोबत चक्क तिहार तुरुंगाचे निलंबित अधीक्षक अजित कुमार हे बसल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. याआधीही तुरुंगात मालिश करतानाचे व लज्जतदार खाद्यपदार्थ, फळफळावळ खाताना जैन यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. जैन यांची मालीश करणारा तरूण हा अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाचा आरोपी असल्याचा दावा भाजपने केला होता.आता भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी जैन यांचा हा ताजा व्हिडिओ तिहार तुरुंगातील शेअर केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)जैन यांना आर्थीक घोटाळा प्रकरणी यंदा ३० मे रोजी अटक केली. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com