MP Ramesh Bidhuri Sarkarnama
देश

MP Ramesh Bidhuri News: रमेश बिधुडींना लोकसभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवणार ? विशेषाधिकार समिती करणार चौकशी

BJP MP Ramesh Bidhuri and BSP MP Danish Ali : भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

Ganesh Thombare

Delhi News : भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत बोलताना बसपचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर बिधुडी यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला होता. मात्र, आता रमेश बिधुडी यांनी लोकसभेत केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवण्याची चिन्ह आहेत.

कारण खासदार दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरलेल्या प्रकरणाची आता लोकसभेची समिती चौकशी करणार आहे. त्यामुळे रमेश बिधुरी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात 'चांद्रयान-३ मिशन'संदर्भात रमेश बिधुरी लोकसभेत बोलत होते. त्यावेळी रमेश बिधुरी यांनी खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली.

त्यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे राजकारण चांगलच तापलं होतं. त्यानंतर दानिश अली हेदेखील चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचेही दानिश अली म्हणाले होते.

यानंतर लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधुडी यांचे वक्तव्य काढून टाकण्यात आले होते. पण याविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रमेश बिधुडी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली होती. मात्र, तरीही रमेश बिधुडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे आता रमेश बिधुडी यांच्या वादग्रस्त वक्तव्याची लोकसभेची समिती चौकशी करणार आहे.

रमेश बिधुडी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे देण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. त्यामुळे आता रमेश बिधुडी यांना त्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. यावर आता रमेश बिधुडी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणेदेखील महत्त्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT