MP Ramesh Bidhuri News: राजस्थानसाठी भाजपचा मेगा प्लॅन; खासदार रमेश बिधुरींवर सोपवली मोठी जबाबदारी

Rajasthan News: रमेश बिधुडी यांना टोंक जिल्ह्याच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
MP Ramesh Bidhuri
MP Ramesh BidhuriSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत बोलताना बसपाचे खासदार दानिश अली यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर बिधुडी यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला होता. पण आता याच रमेश बिधुडी यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत.

खासदार रमेश बिधुडी यांच्यावर राजस्थानमधील टोंक जिल्ह्याच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. या जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी एका मतदारसंघात काँग्रेस नेते सचिन पायलट आमदार आहेत.

राजस्थान विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप जोरदार कामाला लागलं आहे. याच अनुषंगाने रमेश बिधुडी यांना टोंक जिल्ह्याच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

MP Ramesh Bidhuri
Ghodganga Sakhar Karkhana : घोडगंगा कारखान्याचं त्रांगडं सुटणार का? हंगामाबाबत काय होणार निर्णय? उद्याच्या सभेकडे लक्ष

या निवडीनंतर बिधुरी यांनी जयपूरमधील पक्षाच्या बैठकीलाही उपस्थिती लावत आढावा घेतला आहे. यावरून आता दानिश अली यांनी बिधुरी यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून भाजपने आपला खरा चेहरा दाखवला, असा टोलाही त्यांनी लगावला.

देशातील पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्याने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यामध्ये तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवरच पदाधिकाऱ्यांकडे नवीन जबाबदाऱ्या पक्षांकडून देण्यात येत आहेत. याच अनुषंगाने आता भाजपने खासदार रमेश बिधुडी यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.

Edited By- Ganesh Thombare

MP Ramesh Bidhuri
MP Ramesh Bidhuri : भाजप खासदार रमेश बिधुडींचे संसदेत वादग्रस्त वक्तव्य; राजनाथ सिंहांनी मागितली माफी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com