Repo Rate News India Sarkarnama
देश

Repo Rate News India : RBI कडून खूशखबर; पाच वर्षाच पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय; कोणाला फायदा होईल?

RBI Good News Major Repo Rate Cut Announced रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखालील व्याजदरात पाच टक्के कपात करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.

Rashmi Mane

बजेटनंतर जनतेसाठी अजून एक मोठी आनंदवार्ता आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 5 वर्षानंतर भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांच्या नेतृत्वाखालील व्याजदरात पाच टक्के कपात करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Manhotra) ​​यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच बैठक होती. त्यांनी रेपो रेट कमी करून देशाला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपोमध्ये २५ बेसिस पॉइंट कपात जाहीर केले आहेत. ज्यामुळे रेपो दर आता ६.५०% वरून ६.२५% पर्यंत खाली आला आहे. रेपो दरात कपात झाल्यामुळे आता सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील. विशेषतः गृहकर्ज असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 5 वर्षांनी रेपो रेट कमी झाला रिझर्व्ह बँकेने (RBI) शेवटचा दर कोविडच्या काळात (मे २०२०) कमी केला होता.

रेपो दर कमी करण्यापूर्वी आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, अर्थव्यवस्था आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि ती मजबूत ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँक सतत काम करत आहे.

आरबीआयने व्याजदर कमी केल्यानंतर 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावर किती होणार बचत

दुसरीकडे, जर एखाद्याने २० वर्षांसाठी ८.५० टक्के व्याजदराने ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर त्याला दरमहा ४३,३९१ रुपये ईएमआय भरावा लागेल, परंतु रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, हा मासिक ईएमआय ४२,६०३ रुपये होईल. म्हणजे दरमहा ७८८ रुपये वाचतील.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर. जर आरबीआय कमी दराने कर्ज देते, तर बँका ग्राहकांना कमी दराने कर्ज देतात. यामध्ये गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज इत्यादींचा समावेश आहे. रेपो दरात कपात केल्याने मध्यमवर्गाला मोठा फायदा होतो, कारण त्यामुळे ईएमआयचा भार कमी होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT