Girish Mahajan politics: पालकमंत्री विषयावर गिरीश महाजन निर्धास्त, भाजप करणार एकनाथ शिंदे यांची कोंडी?

Eknath Shinde; Girish Mahajan followers firm on Nashik Guardian minister-गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती अद्याप कायम आहे.
Girish Mahajan & Eknath Shinde
Girish Mahajan & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: राज्यात महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. त्याचे राजकीय परिणाम महायुतीतील सहकारी पक्षांना जाणवू लागले आहे. सध्या तरी यामध्ये भाजप सहकारी पक्षांना फारसे महत्त्व देताना दिसत नाही.

नाशिकला भाजपचे गिरीश महाजन तर रायगड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आदिती तटकरे पालकमंत्री घोषित करण्यात आल्या होत्या. त्यावर शिवसेना शिंदे पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे परदेशात असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या नियुक्त त्यांना स्थगिती द्यावी लागली.

Girish Mahajan & Eknath Shinde
Santosh Deshmukh Murder: सुर्यवंशी, देशमुख हत्येचे प्रकरण देवेंद्र फडवणीसांना स्वस्थ बसू देईना!

पालकमंत्र्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर जवळपास महिनाभर सगळ्यांनाच नवे बदल काय होतील, याची उत्सुकता आहे. विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि त्याचे नेते याबाबत खूपच आक्रमक आहेत. नाशिकसाठी दादा भुसे यांच्या नावाचा त्यांचा आग्रह आहे.

Girish Mahajan & Eknath Shinde
Nashik Police: पुण्यात कार्यरत होता बांगलादेशी एजंट; बिल्डर्सच्या साईटवरील मजूर संशयाच्या भोवऱ्यात?

रायगड जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे पक्षालाच पालकमंत्री पद मिळावे, असा देखील आग्रह आहे. त्यासाठी सर्वाधिक आमदार हा त्यांचा निकष आहे. त्यात तडजोड करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे या समस्येवर काय मार्ग काढायचा हा पेच आहे.

पालकमंत्री नियुक्तीचा वाद सुरू असतानाच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचे पालकमंत्री असलेल्या उर्वरित १७ जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री नियुक्त केले आहेत. त्यात नाशिकचा समावेष नाही. त्यामुळे नाशिकला गिरीष महाजन यांचा दावा प्रबळ मानला जातो.

यातून प्रामुख्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे पक्षाचे नेते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. नाशिकला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सहा तर त्या खालोखाल भाजपचे पाच आमदार आहेत. अशा स्थितीत पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसला की भाजपला यावरून वाद सुरू होता. त्याचा फोकस आता अन्यत्र वळला आहे.

नाशिक जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. मात्र भाजपच्या एकाही सदस्याला मंत्रीपदाची लॉटरी लागलेली नाही. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी भाजपचे आमदार आग्रही आहेत. हा वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. गेली दोन महिने याबाबत काहीही तोडगा निघालेल्या नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळ आणि विशेषता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत काम पुढे सरकू शकलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com