Eknath Shinde Sarkarnama
देश

Eknath Shinde Reached Lucknow : भगवं वातावरण अन् ढोल-ताशांचा गजर; मुख्यमंत्री शिंदेंचे लखनौत जंगी स्वागत

Ayodhya News : आजचा मुक्काम लखनौमध्ये

सरकारनामा ब्युरो

Eknath Shinde Ayodhya Tour : अयोध्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी मुंबईहून लखनौसाठी रवाना झाले होते. ते रात्री आठच्या सुमारास लखनौ येथे पोहचले. तेथे त्यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशाच्या पथकांसह व शिवसेनेच्या पदाधिकारी आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्र्यांची उपस्थित होती. मुख्यमंत्री शिंदे विमानतळावर दाखल होताच ढोल-ताशाचा गजर करण्यात आला. यावेळी 'प्रभू रामचंद्र की जय' आणि मुख्यमंत्र्याचा जयघोष करण्यात आला.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईहून रवाना झाले त्याचवेळी लखनौ येथील विमानतळावर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. तेथे त्यांनी स्वागताची चोख तयारी केलेली होती. परिसरात भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे विमानतळावरील वातावरणही भगवे झाले होते.

मुख्यमंत्री लखनौ विमानतळावर दाखल होताच ढोल-ताशाचा गजर करण्यात आला. त्यांचे स्वागत उत्तर प्रदेशातील मंत्र्यांनी केले. त्यावेळी उपस्थितांनी 'जय श्री राम अशा' जयघोष करत परिसर दणाणून सोडला. मुख्यमंत्र्यासंह आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचेही पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

विमातनळ परिसरात मुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी दिसून आली. यातील अनेकांनी काहीना काही भेटवस्तू आणली होती. यात सोन्याचा धनुष्यबाण, गदा आदी वस्तूंचाही समावेश होता. या स्वागताने भारावलो असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, लखनौ आणि आयोध्यात मुख्यमंत्र्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. मुख्यमंत्री शिंदे आज रात्री लखनौ येथे मुक्काम करणार आहेत. ते उद्या सकाळी लखनौहून आयोध्येकडे रवाना होणार आहेत. लखनौ ते अयोध्या या दरम्यान सुमारे दीड हजार बॅनर आणि पोस्टर लावण्यात येणार आहेत.

अयोध्या शहरातील रस्त्यांवर शिवसेनेचे झेंडे भगवे झेंडे फडकत आहेत. शहरात ठिकठिकाणी बॅनर, होर्डींग, पोस्टर्स लावलेले आहेत. त्यावर मुख्यंमत्री शिंदे यांचा भगवाधारी असा उल्लेख केलेला आहे. तर शरयू नदी किनारी मुख्यमंत्री आरती करणार आहेत. त्या ठिकाणाही स्टेज बनविण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT