Eknath Shinde's Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. तर यापूर्वीच मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत आयोध्येत पोहचले आहेत. काल शुक्रवारी शेकडो शिवसैनिक रेल्वेने अयोध्येसाठी रवाना झालेले आहेत.
अयोध्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच अयौध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या अयोध्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती, पूजा, तसेच शरयू नदीची महाआरती होणार आहे. तर या महाआरतीच्या पूर्वसंध्येला शरयू नदीच्या आरतीची पूर्व तयारीची पाहणी नाशिकमधील शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लखनौ येथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी ते लखनौहून अयोध्येकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. अयोध्यानगरी मुख्यमंत्री शिंदेच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. लखनौ ते अयोध्या या दरम्यान सुमारे दीड हजार बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते शरयू नदीची देखील महाआरती होणार आहे. या महाआरतीसाठी शरयू नदी किनारी देखील तयारी करण्यात आली आहे. या पूर्व तयारीची पाहणी करत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.