Supreme Court hearing : सत्तासंघर्ष प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी पार पडली. या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायामूर्ती एम. आर. शहा, न्यायामूर्ती. हिमा कोहली, पी. एस. नरसिंहा आणि कृष्ण मुरारी या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.
आज या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना न्यायालयात एक महत्त्वाची घटना घडली. सुनावणीदरम्यान, लंच ब्रेकनंतर कोर्ट रुममध्ये केनियाच्या सरन्यायाधीशा उपस्थित झाल्या. मार्था करंबू कोमे या केनियाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश आहेत. त्यांनी सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थिती लावली.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्वतः कोर्ट रुममधील मान्यवरांना त्यांची ओळख करून दिली. या वेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटलाही मी त्यांना सांगितला, असे चंद्रचूड म्हणाले. तसचे त्यांच्या सोबत केनियाचे इतर न्यायमूर्ती देखली उपस्थित होते. त्यांनीही कोर्ट रुपमध्ये थोडा वेळासाठी उपस्थिती लावली.
मागील काही दिवसांपासून केनियाच्या न्यायामूर्तींचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मार्था कोमे आणि त्यांच्या शिष्टमंडळांने सर्वोच्च न्यायालयात हजेरी लावली. यावेळी केनियाचे काही वकीलही हजर होते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वांची ओळख करून दिली. सरन्यायाधीशांनी त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीवरही भाष्य केले.
शिंदे गटाचे वकिल महेश जेटमलानी युक्तीवाद करत असताना हे न्यायामूर्ती कोर्ट रुमध्ये आले. त्यांनी थोडावेळ युक्तीवाद ऐकला. त्यांनातर त्यांना सोडण्यासाठी स्वत: सरन्यायाधीश आणि इतर न्यायमूर्ती गेले होते. त्यामुळे सत्तासंघर्षावरील सुनावणी थोडावेळ थांबली होती. दरम्यान, उद्या सकाळी सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या ता. (१५ मार्च) राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता हे युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.