Shivsena News : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी आपल्या युक्तीवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांच्यानंतर आता ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तीवाद केला.
कौल यांच्यानंतर महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु झाला आहे. जेठमलानी म्हणाले, ठाकरे गटाच्या वतीने दोन प्रमुख मागण्या आहेत. पहिली म्हणजे, बंडखोर आमदारांना अपात्र करा. दुसरी म्हणजे शिंदेंच्या सत्तास्थापनेची पूर्ण प्रक्रिया मागे घ्या. महाविकास आघाडी स्थापन होताच आघाडीमध्ये असंतोष व विभाजन सुरू झाले होते. शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत दीर्घकाळ वैचारिक मतभेत राहिले आहेत, असेही जेठमलानी यांनी सांगितले.
21जूनला मतभेद प्रत्यक्ष समोर आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरुन दूर केले. सत्तांतराच्या सर्व घटनाक्रम जेठमलानी यांनी न्यायालयात पुन्हा सांगितला. विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात, अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर कारवाईचा अधिकार राहत नाही. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी स्वत:च त्यावर निर्णय घेणे, हे न्यायसंगत नाही. येथे अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे, असा युक्तीवाद जेठमलानी करत आहेत.
आमदारांना अपात्रते करण्यासाठी नोटीस दिली, त्यावर आमदारांना उत्तर देण्यासाठी किमान 14 दिवसांचा वेळ द्यायला हवा. आमदारांना 14 दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. अपात्रतेचा निर्णय सभागृहात व्हायला हवा. पक्षाच्या बैठकीत सुरेभ प्रभू यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. तर, नवे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली होती.
यानंतर घटनापीठाने जेठमलानी यांना केवळ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले. बंडखोर 16 आमदारांनाच मुद्दाम अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती, सर्व 39 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली नसल्याचे जेठमलानी म्हणाले. बंडखोर आमदारांमध्ये फूट पाडण्यासाठीच केवळ 16 जणांना नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप जेठमलानी यांनी केला. यावर अॅड. हरिश साळवे आणि तुमच्या युक्तिवादात विसंगती आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, काही आमदारांनी परत यावे, या हेतूनेच केवळ 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. आता शिंदे गटाच्या वतीने सिंग हे युक्तीवाद करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.